Home विशेष अबब…! हे काय? वर्धा जिल्ह्यातील “कोरा” ग्रा.पं.सदस्याचे नाव “कोरपना” मतदार यादीत

अबब…! हे काय? वर्धा जिल्ह्यातील “कोरा” ग्रा.पं.सदस्याचे नाव “कोरपना” मतदार यादीत

16
0

Pratikar News

गडचांदूर/विशेष प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्ह्यात शेवटच्या टोकावर असलेल्या तालुका कोरपना नगरपंचायतची निवडणूक काही महिन्यावर येवून ठेपली असून यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते आपापल्या परीने कामाला लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.विविध प्रकारच्या आरोप प्रत्यारोप, वादविवाद सुरू असतानाच येथील मतदार यादीत समाविष्ट बोगस नावांचा मुद्दा कमालीचा गाजत आहे.याविषयी मागील ८ महिन्यापूर्वी तक्रार केल्याने अंदाजे ४०० च्या जवळपास बोगस मतदारांची नावे तहसीलदार साहेबांनी वगळले होते.

यामुळे बोगस नावांचा भरवश्यावर निवडून येण्याच्या बेतात असलेल्यांचे धाबे दणाणले. मात्र आता नगरपंचायतची निवडणूक जवळ येताच पुन्हा जानेवारी महिन्यात अॉनलाईनचे परत अंदाजे २५० बोगस नाव यादीत समाविष्ट करण्यात आले असून यात आश्चर्य म्हणजे एकच की,महाराष्ट्रात जानेवारी २०२१ मध्ये काही ठिकाणी ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या.

याच श्रेणीत वर्धा जिल्ह्यातील ता. समुद्रपूर येथील “कोरा” येथेही ग्रामपंचायत निवडणूक झाली.यात येथील वार्ड क्रमांक ४ मधून “पंढरे शिरीष रामभाऊ” यांनी “कढाई” या चिन्हावर निवडणूक लढली आणि जिंकली सुद्धा.आज घडीला तो कोरा येथे ग्रा.पं.सदस्य आहे.याच कालावधीत पंढरे व त्यांच्या कुटुंबातील लोकांचे नाव चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील वार्ड क्रमांक ६ या मतदार यादीत २७७ क्रमांकावर समाविष्ट करण्यात आले आहे.शिरीष पंढरे यांचे नाव कोरा येथे व कोरपना मतदार यादीत ही नाव समाविष्ठ असल्याचे मतदार यादीतून कळते. पंढरे यांनी ग्राम पंचायतची निवडणूक लढविताना तयार केलेले बॅनर व इतर संपूर्ण पुरावे सुनील देरकर यांच्याकडे उपलब्ध असून पंढरे यांनी याठिकाणी नाव समाविष्ट करताना खोटे कागदपत्र जोडून शासनाची फसवणूक केली असल्याचे आरोप करत सदर व्यक्तीवर पोलीस कारवाईची मागणी सुनील देरकर, नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक अमोल आसेकर, अँड.श्रीनिवास मुसळे,मोहब्बत खान,नदीम शेख इतरांनी कोरपना तहसीलदार यांच्याकडे निवेदनातून केली असून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच कारवाईचे आश्वासन तहसीलदारांनी दिल्याची माहिती आहे.आता याविषयी काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here