नागपुर…
ऍड हरिदास बाबू आवळे यांना त्यांच्या स्मृतिदिन विनम्र अभिवादन🌹🙏*
ऍड. आवळे बाबू डॉ. बाबासाहेबांचे सच्चे कार्यकर्ते. समता सैनिक दल असो की राजकिय पक्ष शेकाफे पासून रिपब्लिकन पर्यत आवळे बाबूंनी निष्ठेने आणि तन मन धनाने बाबासाहेबांच्या विचारांना, तत्वांना कुठेही तडा जाणार नाही असेच कार्य केले. तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. असे सच्चे नेते शोधून सापडणार नाही. बाबूजींजे संपूर्ण कार्यच आदर्शवत आहे त्यातला त्यात त्यांच्या जीवनातला एक प्रसंग मला अतिशय आदर्शवत वाटतो आणि त्यांच्या विषयीचा आदर अधिक फुलून येतो.
प्रसंग त्यावेळचा आहे जेव्हा नागपूर मध्यपदेशात समाविष्ठ होता आणि नागपूर मध्यप्रदेश ची राजधानी होती. त्यावेळी रवीशंकर शुक्ला हे मुख्यमंत्री होते आणि ते एकदा बाबूजींनी गाडीने भेटायला आले.पावसाळ्याचे दिवस होते. बाबूजी व त्यांची पत्नी दोघेही आपल्या झोपडीला पावसापासून वाचवण्यासाठी झोपडीची डागडुजी (छतावर बसून छत छावत होते) करीत होते. बाबूजींना झोपडीच्या छतावर बनियान (धुळीने काली झालेली) वर बघून तत्कालीन मुख्यमंत्री शुक्लाजी आश्चर्यचकित झाले कारण बाबूजी माजी एम. एल. ए. होते. मुख्यमंत्री शुक्लाजी म्हणाले *तू माझ्या मुलासारखा आहेस. तू ह्या झोपडीत राहू नकोस मी तुला माझ्या मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतो आणि बंगला राहायला देतो. तू नेता आहेस* तत्वनिष्ट बाबूजींनी उत्तर दिले *मला तुमच्या मंत्रीमंडळात मंत्रिपद नको. मी ह्या झोपडीत सुखी व समाधानी आहे. मी त्याच मंत्रीमंडळात मंत्रिपद स्वीकारणार जे मंत्रिमंडल बाबासाहेबांच्या तत्वावर आधारित असेल. असे सडेतोड उत्तर देऊन त्यांची* ऑफर लगेच धुडकावून लावली. बाबूंजींना तत्व आणि रिपब्लिकन पक्ष महत्वाचा होता. मुख्यमंत्री आवेशात आले आणि म्हणाले *तू बाहेरून जसा काळा आहेस तसाच आतून सुद्धा* आणि रागारागात गाडीत बसून निघून गेले.
असे हे तत्वनिष्ठ बाबूजी. आज मात्र आमच्या कडे असा आदर्श घेण्याचा वेळ नाही किंवा घ्यायचा नाही. आम्हाला कोणी भुलकवनी दिली की आम्ही लगेच त्यांच्या मागे जातो. आज तत्व, विचार, निष्ठा, आदर्श सारे दुय्यम झाले आहे. खुद्द बाबासाहेबांच्या घरात सुद्धा आज ही संघटनेविषयी, पक्षाविषयी, तत्वविषयी निष्ठा दिसून येत नाही.
आज गरज आहे आपल्याला यांचा आदर्श घेण्याची.
संकलन
उज्वला गणवीर
नागपूर
2 मार्च 2021.
प्रतिकार न्यूज़