Home आपला जिल्हा बसच्या खाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

बसच्या खाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

35
0

 28 फरवरी 2021

 नेताजी हायस्कूल जवळील घटना

(प्रतिकार  न्युज तालुका प्रतिनिधी)

 वरोरा-नागपूर-चंद्रपूर महामार्गावरून विरुद्ध दिशेनें मृतक दुचाकीस्वार येत असतांना बोर्डा चौक येथून भद्रावतीकडे जाण्यासाठी उभी असणारी काळी-पिवळी वाहन क्र.MH 34 2518 या गाडीच्या चालकाने अचानक दार उघडल्याने दुचाकी स्वाराची गाडी धडकली व तो खाली पडला.व त्या ठिकाणावरून नागपूर ते सिरोंचा जाणाऱ्या  बस क्र.MH 40 AQ 6420 च्या मागच्या चक्क्यात  आल्याने घटनास्थळी च दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला.

सदर घटना 28 फरवरी 2021 ,सकाळी 12 वा.सुमारास घटना घडली.

मृतकाचे नाव रोहन उर्फ जॅकी अशोक माटे, वय -24 रा.व्होल्टाज सागर कॉलोनी वरोरा

मृतकचे वडील हे शिक्षक होते.तीन वर्षापूर्वी त्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली . वडील गेले आणि आता मुलाचा अपघातात मृत्यू झाला.त्यामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला.व्होल्टाज सागर कॉलोनी मध्ये शोककळा पसरली आहे.

 

बोर्डा चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी

नागपूर-चंद्रपूर मार्गावरील बोर्डा चौक हा गजबजलेला चौक असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.तसेच महामार्गावरील रस्त्याचे कडेला अवैध प्रवासी वाहतूक करणारे खाजगी वाहने उभी असतात.त्यामुळे  वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने अपघात घडत असतात.तसेच याच मार्गावर नेताजी हायस्कुल असल्यामुळे विद्यार्थ्याना शाळेत जाण्याचा मार्ग हाच असल्याने अपघाताला टाळण्यासाठी भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनावर प्रतिबंध घालण्यासाठी बोर्डा चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी केली जात आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here