Home आपला जिल्हा भारतीय मजदूर संघाचे मुख्य महाव्यवस्थापक कार्यालयापुढे धरणे आंदोलन

भारतीय मजदूर संघाचे मुख्य महाव्यवस्थापक कार्यालयापुढे धरणे आंदोलन

65
0

Pratikar News

राजुरा,  -(विशेष प्रतिनिधी)
भारतीय कोयला खदान मजदूर संघाने कोळसा खाण कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज दिनांक 28 फेब्रुवारीला दुपारी चार वाजता सास्ती टाऊनशिप येथील बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाव्यवस्थापक कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले. सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत चाललेल्या या आंदोलनात भामसं चे कार्यकर्ते व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या आंदोलनाचे नेतृत्व अ.भा.ख.म. संघाचे महामंत्री सुधिर घूरडे, वेकोलि सुरक्षा समिति बोर्ड सदस्य दिलीप सातपुते, वर्धा व्हॅली अध्यक्ष रमेश मुक्फलवार, आशालता सिन्हा, बि.पी.पाटील, जोगेंन्दर यादव, विवेक अल्लेवार, शांताराम वांढरे, निकेश शिवहरे यांनी केले.
बल्लारपूर क्षेत्रात आठ कोळसा खाणी असून येथे सुरक्षित कार्य करण्यासाठी पुरेश्या सोई व उपकरणे उपलब्ध करून देण्यात आल्या नाही. त्यामुळे इथे अनेक अपघात झाले आहेत. कामगारांसाठी कल्याण निधी अंतर्गत योग्य ती सुविधा पुरविली जात नाही तसेच येथील कामगार वसाहतींमध्ये अनेक क्वार्टर्स मध्ये दुरुस्ती करण्यात येत नाही. क्षेत्रीय रुग्णालयात कामगारांना योग्य सुविधा उपलब्ध होत नाही आणि वैद्यकीय देयकेही लवकर प्रदान केले जात नाही. याशिवाय कामगारांचे थकित वेतन, बढती यासारख्या अनेक समस्या असून त्यांची तातडीने सोडवणूक करावी, बदली कामगारांना दैनिक भत्ता व वाहतुक भत्ता देण्यात यावा, ठेकेदारी कामगारांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशा अनेक मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक 1 मार्च पासून सामूहिक लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here