Home आपला जिल्हा कोविड योध्द्याचा थकीत पगाराने जिव गेला,अजून पगार नाही मिळाला…. पण...

कोविड योध्द्याचा थकीत पगाराने जिव गेला,अजून पगार नाही मिळाला…. पण मरणानंतर चौकशी मागे लागली.. वैद्यकीय शिक्षण विभागाचा अजब कारभार

50
0

चंद्रुपुर….

कोविड योध्द्याचा थकीत पगाराने जिव गेला,अजून पगार नाही मिळाला….
पण मरणानंतर चौकशी मागे लागली..
वैधकीय शिक्षण विभागाचाअजब कारभार

अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात कार्यरत संगीता पाटील व प्रदीप खडसे यांचा थकीत पगाराच्या मानसिक तणावने मृत्यू झाला. खडसे यांचे मृत्यूपुर्वीचे
थकीत पगार परिवाराला देण्यात यावे म्हणून ‘जनविकास’ चे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी अधिष्ठाता कार्यालयावा अर्ज दिला. मात्र प्रदीप खडसे व इतर काही कामगारांच्या नियुक्ती बाबत एक तक्रार व माहीतीचा अधिकार अधिष्ठाता कार्यालयाला प्राप्त झाला. अधिष्ठाता कार्यालयाने त्यावर तातडीने कारवाई करून वरिष्ठ स्तरावर चौकशीसाठी प्रस्ताव पाठवले व आता प्रदीप खडसे यांची नियुक्ती कधी व कशी झाली याची चौकशी आधी होईल व नंतर त्यांचे मृत्यूपुर्वीचे थकीत पगार द्यायचे किंवा कसे याबाबत निर्णय होईल.जीव गेला, पगार नाही मिळाला पण कोविड योध्द्यांच्या मरणानंतर चौकशी नशिबाला आली, असा गजब कारभार वैद्यकीय शिक्षण विभागाचा आहे.
चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये कंत्राटी कामगारांची नियुक्ती करताना अनियमितता झाले किंवा कसे हे तपासण्यासाठी मुंबई येथुन वैद्यकीय शिक्षण विभागाची तीन सदस्यांची समिती चंद्रपूर मध्ये दाखल झाली.वैद्यकीय शिक्षण विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गणेश बडधरे,प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख तसेच सहसंचालक एस.पी.डांगे यांचा या समितीमध्ये समावेश आहे.काल रविवार दिनांक २१ फेब्रुवारीला समितीचे दोन सदस्य वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. तसेच आज सोमवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सहसंचालक एस.पी. डांगे चंद्रपूरला आले. वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कामगारांच्या सेवा घेताना कंत्राटदाराने नियुक्त केलेल्या कंत्राटी कामगारांची यादी व संख्या तपासण्याचे काम तसेच मे २०२० मध्ये पूर्ण झालेल्या निविदा प्रक्रियेच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे काम ही समिती करणार आहे.समितीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर कंत्राटी कामगारांना सात महिन्याचे थकीत पगार व किमान वेतन देण्याबाबत निर्णय होणार असल्याचे सूत्रांकडून माहितीस आले.

काम केलेल्या कामगारांचे नियमानुसार वेतन थकीत ठेवता येत नाही – पप्पू देशमुख

चौकशी करिता आलेल्या समितीला जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख,राहुल दडमल व आकाश लोडे यांच्या शिष्टमंडळाने लेखी तक्रारीसह अधिष्ठाता कार्यालय व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारा विषयी उपलब्ध असलेले पुरावे सादर केले.कंत्राटदार किंवा अन्य कोणीही अतिरिक्त कामगारांची नियुक्ती केलेली असल्यास त्याबाबत कारवाई करण्याचा अधिकार वैद्यकीय शिक्षण विभागाला आहे.परंतु आजपर्यंत काम केलेल्या प्रत्येक कामगाराला नियमानुसार पगार द्यावाच लागतो.पेमेंट ऑफ वेजेस अॅक्ट च्या कलम ४ नुसार काम केलेल्या कामगारांना दर महिन्याला नियमित वेळेवर पगार देणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे कंत्राटदाराने पगार दिलेला नसल्यास मुख्य नियोक्ता म्हणून पगार देण्याची जबाबदारी अधिष्ठाता कार्यालयाची आहे.पगार थकित ठेवणे हा कंत्राटी कामगार कायदा १९७० मधील कलम ४ नुसार दंडनीय अपराध असून यासाठी तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद सुद्धा आहे, याची जाणीव वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना नसल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले.
दोन कंत्राटी कामगारांचा थकीत पगाराच्या ताणामुळे मृत्यू झाल्यानंतर तातडीने कामगारांचे पगार देण्याऐवजी एका तथाकथित तक्रारीचा आधार घेऊन कोविड आपत्तीमध्ये मध्ये जीवावर उदार होऊन विना-वेतन काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या नियुक्तीच्या चौकशीला प्राधान्य देणे बेकायदेशीर व अमानुष पणाचे लक्षण आहे. ज्या कारणांमुळे पगार थकीत आहेत त्या अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे व संचालक डाॅ.तात्यासाहेब लहाने यांच्या भ्रष्टाचाराविषयी समिती बोलायला तयार का नाही? हा जन विकास कामगार संघाचा सवाल आहे. कार्याला बाहेरील लोकांशी हातमिळवणी करून अधिष्ठाता डाॅ.अरूण हुमणे कामगार व कामगार संघटने विरूध्द खोट्या तक्रारी,बनावटी माहितीचे अधिकार टाकण्याची व्यवस्था करून न्याय हक्कासाठी लढणाऱ्या कामगारांच्या विरोधात कट कारस्थान करत आहेत. याचे पुरावे संघटने जवळ आहेत.योग्य वेळी पुरावे सादर करून अधिष्ठाता हुमणे यांना आपल्या पद्धतीने धडा शिकवणार असा इशारा सुद्धा देशमुख यांनी दिला.
संकलन
(पप्पू देशमुख)

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here