Home आपला जिल्हा वाघाची पुनःहा नव्याने एंट्री सास्ती – मानोली शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय...

वाघाची पुनःहा नव्याने एंट्री सास्ती – मानोली शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार !शेतकरी बांधवाचे आर्थिक नुकसान

59
0

राजुरा…

सास्तीमानोली शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

 

राजुरा तालुक्यातील सास्ती – मानोली शिवारातील ओढ्याच्या जवळील भागात एका गायी वर हल्ला करुन तिला जागीच ठार केल्याची घटना घडली. आज दुपारी ही घटना उघडकीस आली असून दोन दिवसापूर्वी वाघाने गायीवर हल्ला केला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही गाय विनोद चौधरी यांच्या मालकीची आहे. वन विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी – सास्ती कोळसा खाण परिसरा जवळ असलेल्या सास्ती – मानोली शेत परिसरात वाघाचे अस्तित्व आहे. या भागात झुडपी जंगल आणि ओढा असल्याने काही वन्य प्राणी या भागात आहेत. मात्र यामुळे वेकोलिच्या गोवरी वसाहत परिसर व कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहै.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here