Home आपला जिल्हा आमदार सुभाष धोटेंनी घेतला राजुऱ्यातील वाहतुक व कायदा सुव्यवस्थेचा आढावा.अमलबजावनीचे तीन तेरा...

आमदार सुभाष धोटेंनी घेतला राजुऱ्यातील वाहतुक व कायदा सुव्यवस्थेचा आढावा.अमलबजावनीचे तीन तेरा ,रेती तस्कराचे ट्रक्टर भरधाव वेगात!…

82
0

राजुरा…

आमदार सुभाष धोटेंनी घेतला राजुऱ्यातील वाहतुक व कायदा सुव्यवस्थेचा आढावा.

राजुरा (ता.प्र) :– तहसील कार्यालय राजुरा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली राजुरा येथील वाहतुक व्यवस्था व कायदा सुव्यवस्थे विषयी आढावा बैठक पार पडली. अनेक विषयावर चर्चा झाली,मात्र शहरात रेती तस्कर भरधाव वेगाने रेतीचे ट्रक्टर चलवित असल्याने ,नागरिकच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.रेती ट्रक्टर चालक बिगर नंबर चे अनेक वाहन भरधाव वेगाने रेती भरून शाहरातून चलवित असतात आपली ट्रक्टर पकडू नये या भीति पोटी गाड़ी भरधाव चलवित असतात ,त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही .आमदार सुभाष भाऊ धोटे यानी खालील विषयावर महत्वपूर्ण बैठकही लावली अनेक अधिकारी हाजर सुद्धा होते,पण अंमलबजावणी करणार कौन!नुकतीच कोरोना बाबत काही ठिकाणी चिंताजनक परप्स्थिति निर्माण होत आहे,राजुरा शहरात खाजगी शिकवनी वर्ग हाउस फुल्ल भरत आहेत,त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे,नियम फक्त जनतेनीच पाळायचे !शहरात निकृष्ठ दर्जचा बर्फ त्याचा गोला विक्री जोरात सुरु आहे,भेलपुरी बंडीवर गर्दी नियामच पालन होत नाही नगरपरिषद। याबाबत उदासीन दिसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे,सुगन्धि तम्बाकू विक्री जोरात! शहरात प्लास्टिक चा वापर सर्वत्र होत आहे,अशी स्थिति शहरात आहे.एक दिवस कोनाचा तरी अपघात किवा जीविताला धोका झाल्यास जाग येईल !
यापूर्वी घेतलेल्या बैठकीत ज्या विषयावर चर्चा केली ते विषय राजुरा शहरातील मुख्य मार्ग व अंतर्गत मार्गावर अनाधिकृत अधिकृत पार्किंगची व्यवस्था, शहरातील मुख्य मार्ग – आसिफाबाद मार्गावर जड वाहने विनाकारण थांबुन असतात, शहरातील बाजारपेठेत पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहणे रस्त्यावर उभी असतात त्यामुळे त्याचा इतरांना त्रास होतो, त्यावर उपाययोजना करणे. शहरातील सिग्नलची व्यवस्था कार्यरत आहे की नाही ते पाहणे, जड वाहनांच्या वेग मर्यादेबाबत उपाय करणे, ज्योतिबा शाळेजवळ वेग मर्यादेचा बोर्ड लावणे, शहरातील मुख्य मार्ग व अंतर्गत मार्गावरील अतिक्रमणामुळे वाहणे रस्त्यावर उभी असतात यासंदर्भात भुमिका निश्चित करणे, स्टंटबाज /कर्कश आवाजाची वाहणे यांवर बंदणे लावणे, राजुरा शहरात सि.सि.टि.व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था अध्ययावत करणे, राजुरा ते सास्ती व राजुरा ते गडचांदुर रोड वरील अनधिकृतपणे उभे असलेल्या जड वाहनांमुळे अपघात होत असतात यावर उपाय करणे, लायसन्स पासिंग करीता राजुरा व कोरपणा येथे नियमित शिबीर लावणे. राजुरा आगार डेपोत एकुण किती अधिकरी, कर्मचारी कार्यरत आहेत ? याची माहिती देणे, राजुरा आगारात एकुण किती बसेस उपलब्ध आहेत. व त्यापैकी नविन बसेस किती, जुन्या बसेस
किती, नविन बसेसची आवश्यक्ता असल्यास माहिती देणे. कोरोना परिस्थीती उदभवण्यापूर्वी जिथे जिथे बसेस सुरू होत्या तिथे बसेस सुरू करण्यात आले आहे की नाही ही वस्तुस्थिती तपासणे इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, उपविभागीय अधिकारी राजुरा संपत खलाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार, परिवहन अधिकारी चंद्रपूर कुलवीर शिंग कलशी , राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक मारुती पाटील, म. रा. परिवहन मंडळ चंद्रपूर, जिल्हा वाहतुक नियंत्रक घोडमारे, पोलिस निरीक्षक राजुरा चंद्रशेखर बहादुरे, उप अभियंता सा. बा. उपविभाग राजुरा आकाश बाजारे, विजय जांबूळकर, वैध मापनशास्त्र अधिकारी चंद्रपूर आदी मान्यवर उपस्थित होते.आता अंमलबजावणी सुरु करा ,आणि भरधाव वेगाने रेती तस्कर रेती भरून शहरात वाहने चलवितात ते बंद करा ,कोणाचा जीव जान्या आधी कार्रवाई करा म्हणजे नागरिक सुरक्षीत राहतील .

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here