Home Breaking News आंबेडकर चळवळीतील भीम आर्मीचे बोरकर यांचे पुढेअखेर प्रशासन नमले ..

आंबेडकर चळवळीतील भीम आर्मीचे बोरकर यांचे पुढेअखेर प्रशासन नमले ..

25
0

कोरपना..

🔷अखेर बोरकरांचे उपोषण मागे जिहाप्रशासणाने
दिले उचस्तरिय चौकशीचे आश्वासन.

 

🔷 अबब अखेर बोरकरांनी घेतले उपोषण मागे.

शिलाताई धोटे कोरपना :- चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरात मागील  आठ दहा महिन्या पासून प्रशासना कडून शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत चालले असून याकडे स्थानिक शासन सुस्त बसली आहे.रोज तक्रारी न प ला येऊनही कुठलीही दखल घेतल्या जात नाही.अनेकदा वृत्तपत्रात बातमी झडकूनही सताधारी गप्प का असा प्रश्न गडचांदूर वासींना पडला आहे भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकरांनी मागील चार महिन्यापासून येथील झालेल्या घनकचरा व्यवस्थापन ठेक्यात भ्रष्ट्राचाऱ्या ची उच्च चौकशी करिता अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.

 मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कुठलीही चौकशी केली नाही.शहरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजत आहे डेंग्यूचा प्रादुर्भाव जोमाने वाढत आहे.आठ-दहा लोकांचे डेंगू सारख्या रोगाने जीव गेले आहे तर कित्येक नागरिक मृत्यूशी झुंज देत आहे.मदन बोरकर यांनी घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारा कडून करारनाम्या नुसार काम न करून घेता संगनमताने खोटे बिल तयार करून भ्रष्ट्राचार केला असल्याचा आरोप केला असून त्याची उच्च स्तरीय चौकशी व्हावी ठेकेदाराचा परवाना काळ्या यादीत टाकण्यात यावे व दोषी अधिकारी विरुद्ध उचित कार्यवाई व्हावी अशी मागणी करीता दि ३०/९/२०२० पासून अन्नत्याग उपोषण चालू केले होत.

आज दिनांक 6 ऑक्टोंबर रोजी उपोषणाच्या 7 व्या दिवशी मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने  हस्ते मा, तहसीलदार ,पोलिस उपनिरीक्षक , शिवसेना , भाजपा , मनसे, रीपाई, या सर्व पक्षांच्या नेत्यासमक्ष मदन बोरकर यांना घनकचरा व्यवस्थापन ठेक्यात भ्रष्ट्राचाऱ्या ची उच्च चौकशी करिता लवकरच आपण समिती गठीत करू असे आश्वासनपत्र देऊन व शीतपेय पाजून 7 व्या दिवशी त्यांच्या अन्नत्याग उपोषणाचा शेवट केला .
 उशिरा का होईना पण प्रशासनाने माझ्या उपोषणाची दखल घेत घनकचरा व्यवस्थापन ठेक्यात भ्रष्ट्राचाऱ्या ची उच्च चौकशी करिता आश्वासन दिले व उपविभागीय अधिकारी राजुरा यांना चौकशी करिता नियुक्त केले त्याबाबत मी जाहीर आभार मानतो असे मदन बोरकर यांनी उपोषण मागे घेतल्या नंतर आपले मत व्यक्त केले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here