Home आपला जिल्हा तनीस वाहून नेणाऱ्या पिकअप गाडीला आग गोवरी येथील घटना गाडीचे मोठे नुकसान।

तनीस वाहून नेणाऱ्या पिकअप गाडीला आग गोवरी येथील घटना गाडीचे मोठे नुकसान।

62
0

राजुरा…

तनीस वाहून नेणाऱ्या पिकअप गाडीला आग
गोवरी येथील घटना….

राजुरा – पोंभूर्णा येथून गोवरी येथे आलेल्या तनीस वाहून नेणाज्या पिकअप गाडीला जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन आग लागून पूर्ण तणीस जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली.
पोंभूर्णा येथून पिक अप गाडी क्र. एम एच 34 बि जी 0620 गोवरी येथे तनीस घेऊन गोवरी येथील शेतकरी ऋषी लांडे यांच्या शेतात जातांना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन पिक अप गाडीलाअचानक आग लागली. आग लागताच परिसरातील शेतकज्यांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला. राजुरा येथून अग्नीशामन दलाला सुद्धा पाचारण करण्यात आले परंतू या पांदन रस्त्याने अग्नीशामन दलाची गाडी पोहचू शकत नसल्याने सदर गाडीतील आगीवर नियंत्रण आणण्यास मोठी अडचण निर्माण झाली. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणले गेले परंतू गाडीतील तणीस वाचवू शकले नाही तर गाडीचेही जळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जिवीत हाणी झाली नसली तरी गाडी चालकांचे हात भाजून तो जखमी झाला आहे. या घटनेत गाडी चे व शेतकज्यांचे मोठे नुकसान झाले असून मदतीची मागणी केली जात आहे.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here