Home आपला जिल्हा चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेत केलेला आर्थिक घोटाळा एकटे लेखापाल असु शकते...

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेत केलेला आर्थिक घोटाळा एकटे लेखापाल असु शकते !

189
0

चंद्रपुर…

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेत केलेला आर्थिक घोटाळा एकटे लेखापाल असु शकते !!

 

मागील काही वर्षापासून चंद्रपुर जिल्ह्यात आर्थिक घोटाळे सुरु आहेत ,त्यात चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक कशी मागे राहिल ते काम येथील लेखपाल यानी करून दाखविले,आता शोधाशोध सुरु केली आहे.
हा आर्थिक घोटाळा काही एका दिवशी करता येत नाही,हे सर्वाना माहित आहे.

चं.जि.म. सह. बँकेने ग्राहकांचे कोट्यवधींची रक्कम खात्यात जमा न करता कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले असुन असा कारनामा करणारा आरोपी रोखपाल अजुनही मोकाट असुन त्याला बॅंकेच्या संचालकांचा पाठिंबा असल्याचे बोलल्या जात आहे. सदर आरोपी अजुनही निलंबित झाला नसल्याने ह्या कुजबुजीला दुजोरा मिळत आहे हे विशेष.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणात नवे खुलासे होत आहेत. चंद्रपूर शहर शाखेत रोखपाल निखील घाटे याने सुमारे दीड कोटींच्या रकमेची अफरातफर केल्याचं समोर आलं आहे. शनिवारी समोर आलेले हे प्रकरण 5 कोटींच्या पुढे असल्याची माहिती समोर येत आहे. घोटाळ्याची माहिती बाहेर येताच बॅंकेच्या खातेदारांत खळबळ उडाली असुन ग्राहक चिंताक्रांत झाले आहेत. शनिवार आणि रविवारच्या सुटीनंतर आज बँक सुरू होताच अनेक ग्राहकांनी आपले खाते तपासण्याकरिता बँकेत धाव घेतली. ग्राहकांनी खातं तपासले असता अनेक खात्यात पैसे टाकलेच नसल्याचा गंभीर प्रकार पुढे आला असल्याचे समजते

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शहर शाखेत रोखपाल घाटे द्वारे फसवल्या गेलेल्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. आता ग्राहकांच्या तक्रारी नोंदवल्या जात आहेत. यासाठी बँकेत एक अधिकारी नियुक्त केला असून, तो या तक्रारी स्वीकारत आहे. तक्रारी देण्यासाठी मोठी रांग बँकेत लागली असून, यात वैयक्तिक आणि सहकारी सोसायट्यांच्या समावेश आहे.

ग्राहकांनी त्यांच्या खात्यात भरण्यासाठी दिलेले पैसे रोखपाल घाटे याने स्वतःच लंपास केले. मागील शुक्रवारी जेव्हा एका सोसायटीने मुख्यालयाकडे तक्रार केली, तेव्हा या घोटाळ्याचं बिंग फुटलं. शनिवारपासून या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू झाली तेव्हा आकडा सव्वा कोटीच्या पुढे आला होता. पण, आज (सोमवार दि. 15 फेब्रुवारी) सकाळपासून सुरू झालेला तक्रारींचा ओघ बघता हा घोटाळा आणखी मोठा असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज अनेक ग्राहकांनी आपल्या खात्याची शहानिशा करण्यासाठी धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार काही तासात घोटाळ्याचा आकडा आणखी 55 लाखांनी पुढे गेला होता. हा आकडा केवळ काही तासांचा आहे, हे विशेष. ग्रामीण भागातून ग्राहक, सभासद शेतकरी, सहकारी सोसायट्या आणि ग्रामपंचायतीचे कारभारी तक्रारी घेऊन येत आहेत. या शाखेतील सुमारे 1700 ग्राहकांना बँकेने मोबाईलवरून मेसेज पाठवले असून, हे सर्व ग्राहक आल्यावर खरा आकडा समोर येण्याची शक्यता आहे. पण या घोटाळ्याने सर्वसामान्य ग्राहक आणि शेतकरी मात्र पुरता हादरला आहे. आपले हक्काचे पैसे मिळणार की नाही, या चिंतेने त्यांना ग्रासले

रोखपालानं केलेल्या अपहार प्रकरणी बँकेने रविवारी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर 420 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पण, अजूनपर्यंत मुख्य आरोपी असलेला बँकेचा रोखपाल निखिल घाटे याला अटक झालेली नाही. बँकेकडून त्याचे निलंबनही झालेले नाही. त्यामुळे या घोटाळेबाजाला वाचवण्याचे प्रयत्न तर होत नाहीत ना, अशी शंका व्यक्त केली जातेय.

दरम्यान, बँकेने ग्राहकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेसमोरील या बँक शाखेत एक अधिकारी नियुक्त केला असून, ग्राहकांना मोबाईलवर मेसेज पाठवले असल्याची माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोटे यांनी दिली.

आरोपीचंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेत केलेला आर्थिक घोटाळा एकटे लेखापाल असुच शकत नाही !
रोखपाल घाटे याने अफरातफर केलेल्या पैशांचा वापर आयपीएलवरील सट्टा खेळण्यासाठी, ओळखीच्या लोकांना व्याजाने देण्यासाठी वापरल्याची माहिती पुढे येत आहे. पण एवढ्या मोठ्या रकमेची अफरातफर एक सामान्य कर्मचारी कुणाचे पाठबळ असल्याशिवाय कसा करू शकतो? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.हा केलेला आर्थिक घोटाला एकटा लेखापाल करू शकतो का !असा प्रश्न निर्माण झाला आहे.बैंक व्यवस्थापक रोजच्या रोज आपले बैंक खाते रिपोर्ट पाहत नव्हते काय!मग या लोकांचे काम कोणते!नागरिकांनी बैंकेत जमा केलेली राशि या बाबत तालमेळ दिसत च नसल्याने आर्थिक घोटाळा करण्यासाठी यांना मोकळे रान मिळते…

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here