Home Breaking News महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन चे संकेत? आज होणार मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांची बैठक...

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन चे संकेत? आज होणार मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांची बैठक #Maharashtra #Lockdown? #Covid-19

318
0
By
(nilesh Nagrale)

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन चे

संकेत?
 
आज होणार मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री आणि 
मंत्र्यांची बैठक
मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागल्याने चिंता सतावत असून , पुन्हा एकदा लाकडाऊन करायचे काय ? यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री , मंत्र्यांची बैठक 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे .
चाचण्यांचे प्रमाण कमी असूनही सकारात्मक रुग्णालय रुग्णाची संख्या वाढत असून , प्रतिबंधात्मक उपाय आणि काळजी घेण्याची गरज आहे . मागील आठवड्यापासून रोजच्या चाचण्यांची संख्या पुन्हा कमी झाली असून बाधितांची संख्या वाढत आहे . मुळात क्षमतेच्या ५० टक्केच चाचण्या होत असून पूर्ण क्षमतेने त्या केल्यास हा कल पाहता बाधितांची संख्याही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही .
मृत्यूसंख्येवर ब : यापैकी नियंत्रण आले आहे . एखादा बाधित निघाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध संपला असल्याने आणि त्याची तसदी घेतली जात नसल्याने लोकही चाचणी केंद्रांवर फिरकत नाहीत .
प्रयोगशाळांत संपूर्ण क्षमतेने चाचण्या होत नसून १०० टक्के क्षमतेने केल्या जाव्यात , असे खुद्द आरोग्यमंत्र्यांनी डिसेंबर महिन्यात निर्देश दिले होते . प्रत्यक्षात काय होतेय , हे रोजच्या चाचण्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते .
सध्या होत असलेल्या चाचण्यांची व बाधितांची संख्या हा कल लक्षात घेतला तर रोजच्या चाचण्यांची संख्या वाढल्याने दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही .

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here