प्रतिकार….
*स्व.विजय वाकडे कुटुंबियांची माजी आमदार श्री. दिपक दादा आत्राम यांच्याकडून सांत्वन*
*सिरोंचा*….सिरोंचा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्राम गृहाचे खांनसामा व मिलिंद बहुउद्देशीय संस्थेचे सक्रिय कार्यकर्ते श्री विजय वाकडे यांचा हृदयविकाराचा झटक्याने 20/9/2020 ला दुःखद निधन झालं होता.
आविस नेते व माजी आमदार श्री दिपक दादा आत्राम हे सिरोंचा शहराचे दौऱ्यावर असतांना कार्यकर्त्यांनी या दुःखद निधनाची माहिती दिली असता माजी आमदारांनी वेळ काढून स्व.विजय वाकडे यांचे घरी भेट देऊन वाकडे कुटुंबियांची सांत्वन करून निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार श्री दिपक दादा आत्राम यांनी स्व.वाकडे कुटुंबियांना त्यांचा मुलाचा अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी व पेन्शनसाठी सर्वतोमदत व सहकार्याची आश्वासन दिले.
स्व.विजय वाकडे यांच्या कुटुंबियांची सांत्वन करतांना माजी आमदार श्री दिपक दादा आत्राम यांचे समवेत आविसचे ज्येष्ठ नेते श्री मंदा शंकर,आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,आल्लापल्ली ग्रा.पं. चे माजी सरपंच विजय कुसनाके, आविस सल्लागार रवी सल्लम,जाकीर भाई, पत्रकार तिरुपती चिट्याला ,नारायण मूडीमडगेला,रवी सुल्तान, श्याम बेज्जनी, मारोती गणापूरपू,रवी बोंगोनी,लक्ष्मण बोल्ले सह आविसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते.