Home शैक्षणिक निशांत रासेकरचे जेईई एडव्हांस परीक्षेत सुयश… एड यादवराव धोटे महाविद्यालय चार विद्यार्थी

निशांत रासेकरचे जेईई एडव्हांस परीक्षेत सुयश… एड यादवराव धोटे महाविद्यालय चार विद्यार्थी

5
0

प्रतिकार….

ऍड यादवराव धोटे महाविद्यालयाच्या निशांत रासेकरचे जेईई ऍडव्हॉन्स परिक्षेत सुयश

राजुरा शहरातील नामांकित ऍड यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी , राजुरा द्वारा संचालित ऍड यादवराव धोटे महाविद्यालयातील निशांत अनंत रासेकर याने बीटेक प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्स २०२० या परीक्षेत एकूण दीड लाख उपस्थित परिक्षार्थी तसेच देशातील ४३ हजार २०४ पास झालेल्या परीक्षार्थांपैकी ६८४८ तर राज्यात ११९४ हा क्रमांक घेऊन यशाचा मानकरी ठरला व ऍड यादवराव धोटे महाविद्यालयाची मान उंचावली तसेच आयटी मध्ये आपले स्थान निश्चित केले .
निशांत हा मूळचा गडचांदुर चा असून वडील शिक्षक तर आई गृहिणी आहे.यापूर्वी निशांतने बारावी बोर्डाच्या परीक्षेतही महाविद्यालयात प्रथम येऊन मानाचा तुरा रोवला .सलग दुसऱ्यांदा बाजी मारल्यामुळे सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ,इतकेच नव्हे तर निशांतला चेस हॉलीबॉल क्रिकेट व गायनाची सुद्धा आवड आहे. त्याने आपल्या घवघवीत यशाचं श्रेय आई-वडील, नातेवाईक व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद यांना दिले आहे.तसेच निशांत च्या पुढील भविष्य करिता संस्थेचे अध्यक्ष सुधीर धोटे माजी आमदार तथा संस्थेचे उपाध्यक्ष ऍड.संजय धोटे ,कोषाध्यक्ष सतीश धोटे ,सचिव ऍड अर्पित धोटे , संस्थेचे संचालक मोहन धोटे ,महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश दुर्योधन ,पर्यावेक्षिका सुप्रिया गोंड , परीक्षा विभाग प्रमुख इर्शाद शेख व संपूर्ण प्राध्यापक वृंद यांनी भरभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या .

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here