Home Breaking News वाघाच्या हल्ल्यात खांबाळा येथील शेतकरी जागीच ठार…

वाघाच्या हल्ल्यात खांबाळा येथील शेतकरी जागीच ठार…

4
0

प्रतिकार…

♦️ वाघाचे हल्ल्यात खांबाला येथील शेतकरी
जागीच ठार

♦️ राजुरा वन क्षेत्रातील घटना,#

♦️ राजुरा(संतोष कुंदोजवार)–

राजुरा वनपरिक्षेत्रातील खांबाला नियत क्षेत्रात काल दिनांक 5 आक्टोंबर रोजी वाघाने हल्ला करून खाबाला येथील मारोती पेंदोर यास जागीच ठार केल्याची घटना घडली वाघाचे हल्ल्यात आतापर्यंत 9 लोकांचा बळी गेला असून आता या वाघाला ठार माराच अशी मागणी होत आहे
मारोती पेंदोर याचे खांबाला गावाला लागून जंगल शेजारी शेती आहे त्यामुळे पाळीव जनावरांना चरण्यासाठी जंगलात गेला होता परंतु घरी परत आला नसल्याने आज शोध घेतला असता जंगलात वाघाचे हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले वाघाने त्याचे 60टक्के भाग खाल्याचे समजते विशेष म्हणजे वाघ हा माणसाला ठार करतो परंतु मांस खात असल्याची अपवाद या नरभक्षक वाघात दिसून येत आहे
घटनेची माहिती होताच वन कर्मचारी घटना स्थळी पोहचले परंतु जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे आता कापूस वेचणीचा हंगाम सुरु होत आहे वाघाचे दहशतीमुळे त्याचा परिणाम होत आहे

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here