Home Breaking News राजुरा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अनिल ठाकूरवार यांचे दुःखद निधन ….

राजुरा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अनिल ठाकूरवार यांचे दुःखद निधन ….

38
0

राजुरा…

अनिल ठाकूरवार यांचे निधन
राजुरा, वार्ताहर –
शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, स्वतंत्र भारत पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आणि राजुरा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्राचार्य अनिल महादेवराव ठाकुरवार यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. ते 64 वर्षाचे होते.
अनिल ठाकूरवार यांचा मागे अपघात झाल्यापासून त्यांची प्रकृती चांगली नव्हती. गेल्या सहा महिन्यापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. दहा दिवसापासुन ते नागपूर येथील खाजगी रूग्णालयात भरती होते. मात्र आज दुपारी एक वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ व मोठा आप्तपरिवार आहे. माजी आमदार अॅड वामनराव चटप, प्रभाकर दिवे,रमेश नळे, डॉ.भुपाळ पिंपळशेंडे,मधुकर चिंचोलकर, दिनकर डोहे यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.

त्यांच्या चुना भट्टी येथील राहत्या घरातून आज सायंकाळी 6 च्या सुमारास अन्त्य यात्रा सुरवात होईल .
अनिल ठाकुरवार सराना भावपूर्ण आदरांजलि .

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here