Home Covid- 19 ही कोरोनाची दुसरी लाट तर नव्हे? राज्यातील या जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

ही कोरोनाची दुसरी लाट तर नव्हे? राज्यातील या जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

37
0

Prarikar news

 

 

ताजी बातमी –  राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. यवतमाळ, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणं गरजेचे झालं आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर पाहिजे त्या पद्धतीने नागरिकांनी काळजी न घेतल्याने ही रुग्णाची संख्या वाढत असल्याचे बोलले जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 14 हजार 842 एकूण पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली असून 434 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या पंधरा दिवसातील आकडेवारी जर बघितली तर जिल्ह्यात 1706 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. त्यातील 25 जणांचा गेल्या पंधरा दिवसात मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण हे यवतमाळ शहर तालुका भागातील आहे.

अनलॉक फेज मध्ये नागरिकांनी कुठलीही काळजी न घेतल्याने आणि शाळा, हॉटेल, लग्न प्रसंग , समारंभ यातून जास्त लागण नागरिकांना झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी सांगितले. कोरोनाची लस आली आहे आता कोणतीही खबरदारी घ्यावी लागणार नाही. या अविर्भावाने ही रुग्ण वाढले असल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी सांगतात. यवतमाळ शहरासह जिल्हाभरात गेल्या 15 दिवसात रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासनानसह आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने मास्क लावणे, सोशल डिस्टनसिंग बाबत कठोर कारवाई केली तरच नागरिक नियम पाळतील अन्यथा आणखी रुग्ण संख्या वाढण्याची भीती आहे.

अकोला जिल्हात गेल्या पंधरा दिवसात झपाट्याने रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. 24 जानेवारी ते 8 फेब्रुवारी पर्यंत 402 रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये मृत्यू दर कमी झालाय. परंतु कोविड – 19 च्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ दिसून येत आहे. त्यासाठी प्रशासन उपाय योजना करत आहे. पण, जिल्हातील नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेताना दिसून येत नाहीत. कोरोनाचे नियम धाब्यावर ठेवून सर्रासपणे नागरीक फिरतांना दिसून येत आहेत.

अमरावती जिल्हात गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात बैठक घेतली. यावेळी त्यांनी वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता चिंता व्यक्त करत कोरोना नियम आता यापुढे सक्तीने पाळावे लागतील, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागतील असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला. तर, पुन्हा लॉकडाऊनला सामोरं जायचं नाही त्यामुळे नियम पाळा असेही त्यांनी सांगितले.

यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या सह अधिकारी वर्गांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना प्रशासनाला दिल्या आतापर्यंत 22261 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर,423 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here