Pratikar News
अमरावती – : जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. त्यामुळे आज अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनासंदर्भात बैठक घेतली, यावेळी त्यांनी वाढत्या कोरोनाच्या प्रकोपाच्या संदर्भात गांभीर्यानं इशारा दिलाय.
अमरावती जिल्ह्यात दररोज 100च्या वर रुग्ण वाढत आहे, तर काल तब्बल 235 रुग्ण वाढले होते, जिल्ह्यात आतापर्यंत 23293 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून, आतापर्यंत 22261 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय, तर 432 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालाय.
कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गाने अनेकांचा जीव घेतला. पण अखेर कोरोनाची लस आणि धोका कमी झाला. पण कोरोना होऊन गेल्यानंतर रुग्णांवर भयंकर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक नागरिकांना कोरोनानंतर लठ्ठपणाची समस्या उद्भवत असल्याचं सांगण्यात येत आहे. अशी अनेक प्रकरणं समोर आली असून नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण आहे. #pratikar News Chandrapur
कोरोना नियम आता यापुढे सक्तीने पाळावे लागतील अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला, तर पुन्हा लॉकडाऊनला सामोरं जायचं नाही, त्यामुळे नियम पाळा, असेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अधिकारी वर्गांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना प्रशासनाला दिल्या तर कोरोनाची लाट पुढे येऊ नये यासाठी कोरोना नियम पाळा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.