Home Breaking News ब्रेकिंग न्यूज! ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य क्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ…

ब्रेकिंग न्यूज! ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य क्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ…

4
0

Pratikar News

चंद्रपूर: जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य क्षेत्रात  वाघाचा मृतदेह  आढळल्यानं एकच खळबळ उडाली. मोहुर्ली गावाशेजारी असणाऱ्या मुधोली जंगलांतर्गत शेतशिवारात हा मृतदेह आढळून आला असून, परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अडीच ते तीन वर्षे वयाचा नर वाघ असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय, वाघाच्या अंगावर मोठ्या जखमा झालेल्या आढळल्या असून, वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही. वाघाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, शवविच्छेदनानंतरच वाघाचा मृत्यू नेमका कसा झाला याचं कारण समजणार आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here