Home राजकारण गडचांदूर नगर परिषदेचा घंटा गाडीचा गडबड घोटाळा.दया तुही देख लेना…

गडचांदूर नगर परिषदेचा घंटा गाडीचा गडबड घोटाळा.दया तुही देख लेना…

47
0

प्रतिकार….
प्रतिनिधि…

♦️दया….!कुछतो गडबड है….! अजूनही चौकशीचे
आदेश का नाही?

♦️शिवसेना,भाजप,मनसे,आठवले व कवाडे गटांतर्फे “निषेध
घोषणा आंदोलन”

♦️भीम आर्मीचे बोरकर यांच्या उपोषणाचा 6 वा दिवस.

♦️शेवटी नगरपरिषद अधिकाऱ्यांना पाठबळ कोणाचे ?

♦️अबब अजूनही प्रशासन लक्षात घेत नाहीत

शिलाताई धोटे कोरपना :- –
चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्र कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी,नगराध्यक्षा,आरोग्य विभाग प्रमुख यांनी संगनमत करून खोट्या बिलांची रक्कम उचलून नगरपरिषदेच्या फंडाची अफरातफर केल्याचा आरोप करत येत्या 20 सप्टेंबर 2020 पर्यंत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी,दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई तसेच कंत्राटदाराचा परवाना काळ्या यादीत टाकावा अन्यथा मला उपोषण आंदोलना सारखा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा “भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर” यांनी कोरपना तहसीलदारांमार्फत संबंधित वरिष्ठांना निवेदनातून दिला होता मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले.अखेर 30 सप्टेंबर रोजी बोरकर यांनी गडचांदूर नगरपरिषदेच्या समोर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.
शहरातील कचरा उचल करणे, घंटागाडीद्वारे घरोघरी ओला-सुखा कचरा गोळा करणे,त्याचे विलगीककरण करणे,सार्वजनिक शौचालय साफसफाई करणे,अशा विविध स्वच्छतेची कामे चंद्रपूर येथील “युवक कल्याण सुशिक्षीत बेरोजगार संस्थेला मागील वर्षी देण्यात आली.ओला-सुखा कचरा विलगीकरण केल्या जात नाही,कमी कर्मचारी लावून काम चालवतात,शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे.डेंग्यू मलेरीया सारख्या रोगांचे रुग्ण वाढत आहे.डेंग्यूमुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहे.सदर कंत्राटदाराकडून करारनाम्या नुसार कुठलेही काम होत नसल्याची तक्रारी होत असतानाही मुख्याधिकारी मॅडम यांनी कंत्राटदारावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता उलट त्याचे बिल पास केले.आश्चर्यची बाब म्हणजे याचे कंत्राट सुद्धा सुरू ठेवण्यात आले.करारनाम्या नुसार त्याच्याकडून काम न घेता,परवाना काळ्या यादीत न टाकता कंत्राटदारा सोबत संगनमत करून करारनाम्यातील अटी व शर्तींना तिलांजली देत खोटे बिल तयार करून पुर्ण बिल कंत्राटदाराला देवून स्वतःचा स्वार्थ साधण्यात आला असे आरोप बोरकर यांनी केले आहे.शासन बोरकर यांच्या उपोषणाची दखल घेत नसल्याचे पाहून शिवसेना,भाजप नगरसेवक,मनसे,कवाडे व आठवले गट पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी 5 आक्टोंबर रोजी गडचांदूर नगरपरिषद शासनप्रशासन विरोधात निषेध घोषणा आंदोलन पुकारले होते.”नगरपरिषदेच्या घनकचरा ठेक्याची चौकशी झालीच पाहिजे,मुख्याधिकारी,आरोग्य अधिकार्‍यांची चौकशी झालीच पाहीजे,नगरपरिषद शासनप्रशासन हाय-हाय” अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणला होता.बोरकर यांच्या उपोषणाची शासनाने त्वरित दखल घ्यावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.ऐवढे असूनही शासनाकडून काहीच दखल घेत नाही म्हणजे “दया कुछतो गडबड है” अखेर नगरपरिषद अधिकाऱ्यांना पाठबळ कोणाचे याविषयी शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले तरी “येतो पब्लिक है ये सब जानती है” असे सुर उमटत आहे.शासन किती दिवस बोरकर यांचा अंत पाहणार हा येणारा काळच ठरवेल हे मात्र तेवढेच खरे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here