Home Breaking News वरोरा, भद्रावती व गोंडपिपरी तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचातीवर भाजपाचा झेंडा – पूर्व केंद्रीय...

वरोरा, भद्रावती व गोंडपिपरी तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचातीवर भाजपाचा झेंडा – पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

6
0

Pratikar News

 


 

चंद्रपूर: नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या लोकसभा क्षेत्रातील वरोरा तालुक्यातील 12 ग्रामपंचायत, भद्रावती तालुक्यातील 7 ग्रामपंचायत व गोंडपिपरी तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींवर सरपंच पदी भाजपाचे उमेदवार विजयी होत भाजपाचा झेंडा फडकला आहे. पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात वरोरा, भद्रावती व गोंडपिपरी तालुक्यात भाजपाने आपले वर्चस्व सिध्द केले आहे.

वरोरा तालुक्यातील माढेळी, आमळी, सोईट, केळी, जामखुळा, बारवा, महालगाव, सुसा, पाचगांव (ठाकरे), जामगांव, आसाळा व महाडोळी, भद्रावती तालुक्यातील चोरा, चिरादेवी, डोंगरगांव, कोंडेगांव, वाघेडा, सागरा, पेवरा, चालबर्डी तसेच गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर, हिवरा, पानोरा, चक घडोली, चेक बेराडी या ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचे सरपंच विराजमान झाले.

नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे वरोरा तालुका अध्यक्ष डाॅ भगवान गायकवाड, श्री ओम मांडवकर, भाजपाचे भद्रावती तालुका महामंत्री नरेंद्र जिवतोडे, विजय वानखेडे,  भाजपाचे भद्रावती तालुका अध्यक्ष श्री तुळशिराम श्रिरामे, गोंडपिंपरी तालुकाअध्यक्ष बबन निकोडे, जि.प. सभापती श्री राजु गायकवाड, पं.स. सभापती श्री प्रविन ठेंगने, सुनिता येग्गेवार, जि.प. सदस्य श्री मारोती गायकवाड, सौ. अर्चना जिवतोडे, श्री यशवंत वाघ, सौ. ज्योजी वाकडे, सौ. विद्या कन्नाके, सौ वैष्णवी बोडलावार, सौ.कल्पना अवथरे, सौ. स्वाती वडपल्लीवार, प.स. सदसय विद्या कांबळे, सौ. रोहीनी देवतळे, श्री महेश टोंगे, सौ. पपीता गुळघाने, श्री खुशाल सोमलकर, सौ. वंदना दाते, श्री. दिपक सातपूते, श्री मनिष वासमवार, अरुण कोडापे, कुसुम ढुमणे, सौ भूमी पिपरे,  आदींनी अभिनंदन केले.

तसेच पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भाजपाचे जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here