Home Breaking News १० वी पास असणाऱ्या तरुणांसाठी शासकीय नोकरीची संधी

१० वी पास असणाऱ्या तरुणांसाठी शासकीय नोकरीची संधी

5
0

Pratikar News

(Nilesh Nagrale)

ताजी बातमी – पोस्ट खात्यानं नुकतंच आंध्र प्रदेश पोस्ट विभाग, दिल्ली पोस्ट विभाग आणि तेलंगणा रेल्वे सर्कलसाठी ग्रामीण पोस्ट सेवक भरतीसाठी एक नोटीफिकेशन जारी केलं आहे. जर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरत असाल तर 26 फेब्रुवारी 2021 पूर्वी इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईटवर appost.in वर अप्लाय करु शकता. आंध्र प्रदेश पोस्ट कार्यालय, दिल्ली पोस्ट कार्यालय आणि तेलंगणा पोस्ट कार्यालयासाठी भरती प्रक्रिया 27 जानेवारी 2021ला सुरु झाली आहे. एकूण 3 हजार 679 रिकाम्या जागांपैकी 2 हजार 296 पदासाठी आंध्र प्रदेश जीडीएस भरती 2021साठी आहे. तर 233 दिल्ली जीडीएस भरती 2021 साठी आणि 1 हजार 150 जागा तेलंगणा जीडीएस भरती 2021 साठी आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार भारत सरकार, राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त शाळांमधून गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी विषयांसह 10 वी पास असायला हवा. ज्या उमेदवारांनी कंम्पल्सरी किंवा ऑपश्नल विषय घेऊन इंग्रजीत शिक्षण घेतलं असेल किंवा कमीत कमी 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलेलं असायला हवं. या पदासाठी अर्ज करणाऱ्या यूआर/ओबीसी/ईडब्ल्यूएस पुरुष/ट्रान्समॅनला अर्जासाठी 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी/एसटी/महिला/ट्रान्सवुमन/पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क असणार नाही. वयाची मर्यादा काय? या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी 18 ते 40 वर्षापर्यंतच्या उमेदवारांना अर्ज करता येईल. नियमांनुसार योग्य प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here