Home शैक्षणिक 🪔ज्ञानाचा दिवा 🪔

🪔ज्ञानाचा दिवा 🪔

14
0

 

अंधारलेली वाट माझी
मी प्रकाशित होताना पाहीली …
तु लाविलास दिवा इथं क्रांतिचा
क्रांतिची आज मशाल होताना पाहीली…

झिजलास तु चंदना सारखा.
गावकुसाबाहेरची झोपडी होताना पाहीली..
तु दिलास मिळवून हक्क शिक्षणाचा.
अन कोटी कोटी माणसे मी बुक वाचताना पाहीली…

तुझ्या हातातला पेन रे बा भिमा.
ती लेखणी तलवार होताना पाहीली..
होताना तुझं त्या रामुवर प्रेम ती रामु कोटी कोटी लेकरांच्या मनात आई होताना पाहीली…

कोटी कोटी लेकरांच्या उद्धारासाठी तुझी ती चार लेकरे जळताना पाहीली.
डोळयात पाणी दाटुन तुझ्या त्यागाची कहाणी..
मी इतिहासाच्या पाना पानात पाहीली…

शोधलास भारतातला ज्ञानाचा दिप तु .
पुन्हा भारताची भुमी बुद्धमय होताना पाहीली..
येवलयाला तु केली होती ना प्रतिज्ञा नागपूर च्या नागभुमीत ती खरी होताना पाहीली…

काय दिलस तु कस शब्दांत व्यक्त करू.
तुझ्या जिवनाची वामन कविता होताना पाहीली..
जागवलस रे बा भिमा तु स्वाभिमान आतला ताटातल्या भाकरीत आज तुझी सही होतात पाहीली…

🖊️कवि _ _ वामन दादा करडक

🙏जयभीम🙏 नमो बुद्धाय 🙏

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here