प्रतिकार
राजुरा, तालुका प्रतिनिधी-
राजुरा तालुक्यातील चंदनवाही गावाजवळ मोटरसायकलने गावाकडे जातांना बैलगाडी उलटून झालेल्या अपघातात चंदनवाही येथील नामदेव मारोती घोटेकर हे जबर जखमी झाले. राजुरा ग्रामीण रुग्णालयात आपल्यावर वैद्यकिय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. राजुरा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
दिनांक 4 फेब्रुवारीला रात्री नामदेव घोटेकर हे दुचाकीने गावाकडे जात होते. या दरम्यान समोरून बस आल्याने त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूने घेतली. त्याच वेळी शेतातून बैलगाडी अचानक रस्त्यावर आली आणि दुचाकीने बैलगाडीला जोरदार धडक दिली. यावेळी ही बैलगाडी उलटून नामदेव यांचे अंगावर पडल्याने ते जबर जखमी झाले. राजुरा ग्रामीण रूग्णालयात जात पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. नामदेव घोटेकर हे चंदनवाही येथे पोस्टमन म्हणुन कार्यरत होते. या महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या मागे पत्नी,भाऊ व मोठा आप्तपरिवार आहे. या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.