Home विशेष त्यात्या विंचूला ‘ओम भट स्वाहा’ महामृत्युंजय मंत्र देणारे बाबा चमत्कार देवाघरी

त्यात्या विंचूला ‘ओम भट स्वाहा’ महामृत्युंजय मंत्र देणारे बाबा चमत्कार देवाघरी

1
0

झपाटलेला चित्रपटात ‘ओम फट् स्वाहा’ हा मृत्युंजय मंत्र देणाऱ्या बाबाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन काल झाले.

झपाटलेला चित्रपटात ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका साकारणारे अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

बाबा चमत्कारने त्यात्या विंचूला दिलेला ‘ओम भट स्वाहा’ हा मृत्यूंजय मंत्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

राघवेंद्र कडकोळ यांनी ब्लक अँड व्हाईट, गौरी, सखी, कुठे शोधू मी तिला, पळवापळवी, वाजवू का?, पंढरीची वारी या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. तसेच करायला गेलो एक, धोंडी, देवदासी, हसुया पण कायद्याच्या कचाट्यात, रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकांत काम केले आहे.

राघवेंद्र कडकोळ यांनी तीस वर्षे मराठी नाटक-चित्रपट, मालिकांतून काम केले. राघवेंद्र यांनी कृष्णधवल चित्रपटांपासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. कर्नाटकी लहजा काढत बोलणाऱ्या भूमिकाच त्यांच्या वाटेला अधिक आल्या.

बालगंधर्व जीवन पुरस्काराने गौरव

राघवेंद्र कडकोळ यांना बालगंधर्व जीवन पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्काराने’ गौरवण्यात आले होतं. त्यांनी गोल्ड मेडल नावाचे पुस्तक लिहिले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here