Pratikar News
(NILESH NAGRALE)
05/02/2021
चेन्नई – आज पासून इंग्लंड आणि भारत यांच्यात होणाऱ्या चार कसोटीच्या मालिकेला चेन्नई येथून सुरवात होत आहे. मायदेशात खेळल्या जाणाऱ्या या कसोटी मालिकेत भारताचे पारडे जड मानल्या जातात असले तरी इंग्लंड संघाला कमी लेखून चालणार नाही. कारण नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात त्यांनी विजय मिळविला आहे. आशियाई विशेषतः फिरकी घेणाऱ्या खेळपट्टीवर खेळण्याचा त्यांना चांगकच सराव झाल्याने इंग्लंड संघाला या अनुभवाचा नक्कीच फायदा मिळणार आहे.
चेन्नई च्या खेळपट्टी बद्दल सांगायचे झाल्यास हि खेळपट्टी क्रिकेटशी संबंध नसलेल्या व्यक्तीने जरी तयार केली असली तरी याकडे तामिळनाडूच्या तांत्रिक समितीचे लक्ष असल्याचे समजते. त्यामुळे ही खेळपट्टी पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजांना तर उर्वरित तीन दिवस फिरकी गोलंदाजांना साथ देईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. इंग्लंड संघाकडे जोफ्रा ऑर्चर आणि जेम अँडरसन सारखे चांगले गोलंदाज आहेत. यापैकी अँडरसन च्या नावावर अनेक किर्तीमान आहेत. आणि मागील काही कालावधी पासून हे दोघेही सातत्याने चांगली कामगिरी करीत आले आहेत.या शिवाय इंग्लंड संघाकडे वुड, बेस, सॅमसुरेन व जॅक लीच हे देखील गुणवान गोलंदाज आहेत. त्यात कुरेन याला आयपीएल चा अनुभव असल्याने भारताच्या मधल्या फळीसाठी तो डोकेदुखी ठरू शकतो.
भारतीय संघाबद्दल सांगायचे झाल्यास ब्रिस्बेन कसोटीत ऐतिहासिक कामगिरीं करून आपली उपयोगीता सिद्ध करणाऱ्या नवेदितांना या कसोटीत खेळण्याची संधी मिळणार असल्याचे बोलल्या जात आहे. असे असले तरी दुखापती तुन सावरलेल्या अनुभवी खेळाडूंना संघात घेऊन संघात समतोल राखण्याचा संघ व्यवस्थापानाचा प्रयत्न असेल. जसप्रीत बुमराह पूर्णतः फिट होऊन संघात परतला असला तरी त्याची ऑस्ट्रेलियातील संमिश्र कामगिरी पाहता कोहली देखील त्याच्या यशाची खात्री देणार नाही. तसेच ब्रिस्बेन कसोटीत जबरदस्त कामगिरी करणारा सिराज आणि ईशांत शर्मा यापैकी एकाला निवडायचे असल्यास अनुभवाच्या आधारावर कोहलीची पहिली पसंती शर्मालाच असणार आहे. असे असले तरी ब्रिस्बेन कसोटीत दमदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराज साठी निवड समितीचाही संघव्यवस्थावणावर दबाब राहील. फिरकी गोलंदाजा बद्दल बोलायचे झाल्यास संघ तीन फिरकी गिलँडआज घेऊन मैदानात उतरणार आहे. त्यात रवीचंद्र अश्विन याची जागा पक्की मानल्या जातात आहे.
अन्य दोन फिरकीपटू साठी वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यात स्पर्धा राहील. फलंदाजीचा विचार केल्यास सुंदर आणि पटेल यांना संधी मीळण्याची जास्त शक्यता आहे. फलंदाजीचा विचार केल्यास कोहली संघात परतल्याने फलंदाजी मजबूत झाली आहे. तसेच मायदेशात कोहलीची कामगिरी इंग्लंड विरोधात जबरदस्त राहिली आहे. संघात या शिवाय रोहित शर्मा, शुभमन गिल, पुजारा, रहाणे, ऋषभ पंत, सुंदर ,पटेल हे सुद्धा चांगली फलंदाजी करीत असल्याने संघा जवळ ८ व्या नंबर पर्यंत फलंदाज असल्याने फलंदाजी खोलवर असणार आहे. इंग्लड च्या फलंदाजाबद्दल बोलायचे झाल्यास संघातील सुरवातीचे तीन फलंदाज अपयशी ठरले आहेत. पण त्यांनतर देखील संघाची कामगिरी जबरदस्त राहिली आहे.
या मुळे फलंदाजीचा भार कर्णधार ज्यो रूट सह जोन्स बटलर आणि आणि डॅनियल लॉरेन्स यांच्यावरच राहणार आहे. वेळ पडल्यास डोमणिक बेस हा भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो.त्याची गेल्या दोन मोसमातील प्रथम दर्जाच्या सामन्यातील फलंदाजी पाहता तो देखील भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेऊ शकतो.मार्क वुड देखील भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो. दुखापतीतून बाहेर आलेला अष्टपैलू हार्दिक पंड्या याला या कसोटीत खेळवणार असल्याचे निश्चित असल्याचे बोलल्या जात असले तरी त्याला कोणाच्या जागेवर संधी द्यायची हा यक्ष प्रश्न निवड समिती समोर असणार आहे. सध्या तरी कोणाला बाहेर काढण्याची हिम्मत संघ व्यवस्थापन करणार नाही. त्यामुळे निदान या कसोटीत तरी त्याला बाहेर बसावे लागणार असे बोलल्या जात आहे.
Post Views:
17