Home विशेष ‘सीआयडी’ ‘इंस्पेक्टर दया नागपूरात

‘सीआयडी’ ‘इंस्पेक्टर दया नागपूरात

19
0
रस्ते सुरक्षा विषयावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जनआक्रोश या संघटनेतर्फे रस्ते-सुरक्षा या विषयावर ‘ चित्रफित नागपूरात तयार होणार

नागपूर 4 फेब्रुवारी 2021

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 दरम्यान रस्ते सुरक्षा महिन्याचा आयोजन करण्यात आल आहे. या अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जनआक्रोश या संघटनेतर्फे रस्ते-सुरक्षा या विषयावर ‘सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये ‘इंस्पेक्टर दया’ पात्राची भूमिका बजावणारे अभिनेते दयानंद शेट्टी यांची एक चित्रफित नागपूर शहरामध्ये तयार करण्यात येणार असल्याची माहिती जनआक्रोश या संस्थेचे सचिव रवींद्र कासखेडीकर यांनी सांगितलं.

नागपूरात आयोजित एका पत्रकार परिषदेत दरम्यान दयानंद शेट्टी यांनी रस्ते अपघात हे एक प्रकारचा मानवी चुकामुळे घडणारे गुन्हाच असल्याचं सांगितलं.समाजात वावरताना आपण जसे नियम पाळतो तसेच जीवनावश्यक असे रस्ते सुरक्षाचे नियम आपण कटाक्षाने पाळले पाहिजे असे आवाहन शेट्टी यांनी यावेळी केले.

जन आक्रोशतर्फे रस्ते सुरक्षा अभियाना अंतर्गत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतुक नियमा बद्दल केलेल्या माहितीपत्रकाची शहरात प्रसिद्धी, प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरक्षा अभियानाचे उद्घाटन, 27 जानेवारी आणि 3 फेब्रुवारी रोजी ‘नो हॉर्न डे’ चे आयोजन, पथ नाट्य असे अ‍भिनव उपक्रम राबवले जात आहेत.

वर्ष 2019 मध्ये 1 लाख 51 हजार 113 लोक हे रस्ते अपघातात मरण पावले यापैकी 68% लोक 18 ते 45 या वयोगटातील होते. रस्ते उपघाताचे मुख्य कारण हे अतिवेग, दारु पिऊन वाहन चालवणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे तसेच सिग्नलचे उल्लंघन करणे ,मोबाईलचा वापर करणे हे आहेत .यातील 67 टक्के अपघात हे अतिवेगामुळे होतात. जनआक्रोश या संघटनेतर्फे वेगावर नियंत्रण, हेल्मेटचा वापर तसेच वाहन चालवताना स्वतःवर नियंत्रण ठेवण्याच आवाहन करण्यात आले आहे. दुचाकीस्वारांच्या अपघातामध्ये सर्वात जास्त मृत्यू हे हेल्मेट न घातल्याने होतात त्यामुळे सर्व दूचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करावे असा आवाहनही या रस्ते रक्षा सुरक्षा अभियानाच्या वतीने जन आक्रोश या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here