Home विशेष निधन वार्ता :- दिवंगत नारायण मेश्राम यांचे निधन

निधन वार्ता :- दिवंगत नारायण मेश्राम यांचे निधन

17
0

Pratikar News

दि.४।२।२०२१रोजी पहाटे१.३०वाजता वृध्दापकाळाने दुख:द निधन झाले.ते भारतीय बौद्ध महासभानागपूर शहराचे,केंद्रीय शिक्षक,बौद्धाच्यार्य,केंद्रीय संघटक होते,माजी मुख्याध्यापक होते.त्यांची अंत्ययात्रा,नरसाळा येथील त्यांचे घरुन निघुन दिघोरी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचे अंत्ययात्रेत.भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा,पश्चिमचे अध्यक्ष आयु.दशरथ शंभरकर,पुर्वचे अध्यक्ष,आयु.गोडबोले,समता सैनिक दलाचे,मेजर जनरल,आयु.एस.एम.पाटील,नागपूर जिल्हा,पश्चिमचे उपाध्यक्ष संस्कार प्रमुख आयु.देवानंद वानखेडे,आयु.वाकोडे,आयु.देवेंद्र मेश्रा म,प्रदेश अध्यक्ष,भारतीय बौद्ध महासभा,महा.राज्य,आयु.बाबुराव ढेंगरे,अध्यक्ष,भारतीय बौद्ध महासभा नागपूर शहर दक्षिण,आयु.गंगाधर कांबळे,उपाध्यक्ष,संरक्षण,भारतीय बौद्ध महासभा नागपूर शहर दक्षिण,आयु.देवानंद वानखेडे,यांनी पंचशील त्रिशरण,देवून,अंत्ययात्रा निघाली.दिघोरी दहन घाट येथे सरणत्त य घेऊन पार्थीवास अग्नि दिला.आदरांजली वाहण्यात आली.शोकसभेचे संचलन,आयु.देवानंद वानखेडे यांनी केले,अध्यक्ष म्हणून आयु.दशरथ शंभरकर होते.शोकसभेत,आयु.पाटील,(SSD)आयु.ढेंगरे,आयु.देवेंद्र मेश्राम,आयु.गेडाम सर,प्राचार्य,मेश्राम दिवंगत मेश्राम यांचे पुतणे यांनी त्यांचे जीवन कार्य याचा उलगडा केला.आम्हा मुलांना त्यांनी कसे सक्षम केले.नोकरी सांभाळून आंबेडकर चळवळ ग्रामीण भागात वाढवीन्यात योगदान दिले.भारतीय बौद्ध महासभेच्या प्रचार आणि प्रसार,तन,मन,धन पुर्वक केला.अध्यक्ष आयु.दशरथ शंभरकर यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त करतांना दिवंगत मेश्राम यांनी वयाच्या ८१व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी भारतीय बौद्ध महासभाच्या कार्यात योगदान दिले.त्यांची उणीव भासत राहील.त्यांचा आदर्श घेऊन भारतीय बौद्ध महासभेला,जिल्हा,शहर,ग्रामीण भागात,प्रत्येक जनात पोहचविन्याचा संकल्प करू या.हिच खरी आदरांजली ठरेल.आभार आयु.गोडबोले यांनी केले.शेवटी सरणत्तय घेण्यात आले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here