चंद्रपूर :- शहरातील गंजवार्ड वार्डातील युवकांनी जिल्हा सचिव अभिनव देशपांडे व युवा नेते केतन जोरगेवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्यप्रणालीला प्रेरित होत इतर पक्ष सोडून मा.साहिल आगलावे, मा.नाजीम शेख, मा.यश चहारे, मा.विशाल राऊत, मा.प्रज्वल पत्रीवार, मा.सोहेल शेख, मा. विजय राऊत यांचेसह इतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
या वेळी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष मा. सुनिल काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मा. प्रदीप रत्नपारखी, रा.वि.काँ. शहर उपाध्यक्ष मा. अंकुश कोल्हे उपस्थित होते.