Home सांस्कृतिक सुभेदार रामजी मालोजी सपकाळ(आंबेडकर)यांची 108 वा स्मृतिदिन निमीत्त अभिवादन

सुभेदार रामजी मालोजी सपकाळ(आंबेडकर)यांची 108 वा स्मृतिदिन निमीत्त अभिवादन

50
0

भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा,पश्चिम चे वतीने कुशीनारा बौद्ध विहार न्यूकैलाश नगर,नागपूर 27येथे दि.02/02/2021रोजी सायं.7वाजता सुभेदार रामजी मालोजी सपकाळ(आंबेडकर)यांची 108 वा स्मृतिदिन निमीत्त अभिवादन सभा घेण्यात आली.सभेच्या अध्यक्ष स्थानी आयु.देवानंद्जी डोंगरे होते.प्रमुख मार्ग दर्शक आयु.देवानंदजी वानखेडे भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा,पश्चिम,उपाध्यक्ष संस्कार प्रमुख यांनी रामजी आंबेडकर यांच्या स्मृतिदिन निमीत्त त्यांचे जीवन कार्य यावर आपले मत मांडले,त्या काळातील वर्णभेद पराकोटीचा होता.रामजीचा स्वभाव गंभिर पन प्रेमळ आणि करारी होता.कोणतेही काम ते जिद्दीने करीत,ते धार्मिक वृतीचे होते.कबिरचे दोहे,संत तुकाराम,संत नामदेव,संत एकनाथ,संत चोखोबा,यांचे दोहे ते गात असत.तेच संस्कार त्यानी भिमावर केले.सुभेदार म्हणायचे:तू शिकुन खुप मोठा हो,मग हेच लोक तुला वाकुन सलाम करतील.कार्यक्रमा चे सुत्रसंचालन आयु.गंगाधर कांबळे,उपाध्यक्ष,संरक्षण(SSD)भारतीय बौद्ध महासभा नागपूर शहर,दक्षिण यांनी केले.आभार प्रदर्शन आयुनी.मीनाताई फुटाणे यांनी केले.कार्यक्रमास:आयुनी.स्मिता नगराळे,ममता ढोबळे,मनिषा पिल्लेवान,आशा चिकाटे,वेणूताई कांबळे,आशा डोंगरे,इंदू नगराळे,माया वासनिक,वंदना नारनवरे,निर्मला ओंकार,सुर्यकांता खंडारे,नलू रंगारी,वंदना तायडे ई.उपासिका उपस्थित होते.धम्मपालन गाथेनी कार्यक्रम संपन्न झाला.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here