By
Ritik NAGRALE
वर्धा : वर्धाजवळ असलेल्या भुगाव येथील उत्तम गालवा या पोलाद प्रकल्पात अचानक स्फोट झाल्याने २८ कामगार व अभियंते भाजल्याची घटना आज सकाळी ११ वाजता घडली.
हा प्रकल्प सध्या १२ फेब्रुरवारीपर्यंत शट डाउन म्हणजेच बंद आहे. प्रकल्पात दुरूस्तीची कामे सुरू आहे. कारखान्यातील ब्लास्ट फर्निशचा स्फोट झाल्याने त्यातून निघालेल्या गरम वाफेमुळे तीन अभियंते तसेच काही कामगार व कर्मचारी मिळून २८ व्यक्ती भाजल्या गेल्या आहेत. या सर्वांना सांवगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
बहुतांश जखमी २०टक्क्याच्या आत भाजले आहे. सर्वांवर तज्ञांच्या देखरेखीत उपचार सुरू असल्याची माहिती रूग्णालयाचे प्रमुख डॉ. उदय मेघे यांनी दिली. या प्रकरणी सावंगी पोलीस पुढील तपास करीत आहे.