Home Breaking News ग्राहक किंमती निर्देशांकासाठी भावसंकलकांनी सतर्क राहावे विभागीय कार्याशाळेत अर्थ व सांख्यिकी प्रादेशिक...

ग्राहक किंमती निर्देशांकासाठी भावसंकलकांनी सतर्क राहावे विभागीय कार्याशाळेत अर्थ व सांख्यिकी प्रादेशिक सहसंचालक कृष्णा फिरके यांचे आवाहन

14
0

प्रतिकार

चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी : ग्राहकापर्यंत पोहचणाऱ्या विविध उत्पादनाच्या किंमतीमध्ये होणारी वाढ व घट ठरविण्यासाठी ग्राहक किंमती निर्देशांक काढण्यात येत असून केंद्र व राज्य स्तरावरील निर्देशांक ठरवण्याचे काम प्रथमच जिल्हास्तरावर होत आहे. ग्राहक किंमती निर्देशांक ठरविण्यासाठी भावसंकलकांनी सतर्क राहून काम करावे, असे आवाहन अर्थ व सांख्यिकी प्रादेशिक सहसंचालक कृष्णा फिरके यांनी केले आहे.
लेखा कोषागार भवन, चद्रपूर च्या सभागृहात ग्राहक किंमती निर्देशांक काढण्यासंदर्भात विभागीय कार्याशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन कराताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास समिती) सुनिल धोंगडे हे उपस्थित होते.
कार्यशाळेचे उदघाटन श्री. कृष्णा फिरके, प्रादेशिक सहसंचालक यांच्या हस्ते संख्याशास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण तसेच दिपप्रज्वलन करुन प्रशिक्षणाला सुरुवात झाली. चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत ग्राहक किंमती निर्देशांक ठरविण्यासाठी 11 भावसंकालकांनी शास्त्रोक्त पध्दतीने ठरवून दिलेल्या विविध वस्तुंचे किरकोळ बाजारातील दर अचूक संकलन करण्यात यावे, यासाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तसेच याबाबतची कार्यपध्दती, भावसंकलन केंद्राची निवड, बाजारपेठेची निवड, वस्तुसुची, वस्तूचे विस्तृत वर्णन, मुख्य राखीव दुकानांची निश्चिती, वस्तु आणि सेवांच्या किंमती संकलन करणे, याचे दैनंदिन जीवनातील महत्व याबाबत श्री. फिरके यांनी माहिती दिली. जिल्हास्तरीय ग्राहक किंमती निर्देशांकावर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ग्राहक किंमती निर्देशांक काढण्यासाठी केंद्र शासनाने निश्चित पध्दत विकसित केली आहे. त्यानुसार भावसंकलकांनी जिल्ह्यातील ‍विविध आस्थापना व कुटुंबांची माहिती संकलित करावयाची आहे. माहितीचे संकलन करताना घ्यावयाची काळजी तसेच पध्दती याबाबत कृष्णा फिरके यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
यावेळी जिल्हा सांख्यिकी अधिकारी अमित सुतार, रमेश पेरगु (गडचिरोली), नियोजन अधिकारी, सुनील धोंगडे यांनी सुध्दा मार्गदर्शन करून ग्राहक किंमती निर्देशांकचे महत्व विशद केले.
कार्यक्रमाचे संचालन श्रीमती रामटेके यांनी केले तर पी. आर. पोरेड्डीवार यांनी आभार व्यक्त केले. कार्यशाळेला प्रादेशिक कार्यालय नागपूर येथील संशोधन सहायक श्री. भुसारी व इतर कर्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here