Home Breaking News 5 फेब्रुवारीला वीज दरवाढीविरोधात महावितरण कार्यालयांबाहेर भाजपचं राज्यभर आंदोलन

5 फेब्रुवारीला वीज दरवाढीविरोधात महावितरण कार्यालयांबाहेर भाजपचं राज्यभर आंदोलन

37
0

5 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभर वीज दरवाढी विरोधात भाजपा आंदोलन करणार आहे. राज्यातील सर्व महावितरण कार्यालयाबाहेर भाजपा आंदोलन करणार असल्याची माहिती आहे.

(प्रतिकार न्युज नेटवर्क)

मुंबई : येत्या 5 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभर वीज दरवाढी विरोधात भाजपा आंदोलन करणार आहे. राज्यातील सर्व महावितरण कार्यालयाबाहेर भाजपा आंदोलन करणार असल्याची माहिती आहे. आजच्या कोअर कमिटीमध्ये वीज दरवाढी विरोधात आंदोलन करण्याची भूमिका ठरवण्यात आली.

भाजपा कोअर कमिटीची बैठक भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज झाली. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे सह प्रभारी शिवप्रकाश उपस्थित आहे. आजच्या अर्थसंकल्पाचा प्रसार प्रचार, आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणूक संदर्भात रणनीती ठरवण्यासाठी भाजपची बैठक झाली.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here