Home आपला जिल्हा आमदार सुभाष धोटेंनी घेतला राजुऱ्यातील वाहतुक व कायदा सुव्यवस्थेचा आढावा.

आमदार सुभाष धोटेंनी घेतला राजुऱ्यातील वाहतुक व कायदा सुव्यवस्थेचा आढावा.

48
0

राजुरा..

आमदार सुभाष धोटेंनी घेतला राजुऱ्यातील वाहतुक व कायदा सुव्यवस्थेचा आढावा.

राजुरा (ता.प्र) :– तहसील कार्यालय राजुरा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली राजुरा येथील वाहतुक व्यवस्था व कायदा सुव्यवस्थे विषयी आढावा बैठक पार पडली.
या प्रसंगी राजुरा शहरातील मुख्य मार्ग व अंतर्गत मार्गावर अनाधिकृत अधिकृत पार्किंगची व्यवस्था, शहरातील मुख्य मार्ग – आसिफाबाद मार्गावर जड वाहने विनाकारण थांबुन असतात, शहरातील बाजारपेठेत पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहणे रस्त्यावर उभी असतात त्यामुळे त्याचा इतरांना त्रास होतो, त्यावर उपाययोजना करणे. शहरातील सिग्नलची व्यवस्था कार्यरत आहे की नाही ते पाहणे, जड वाहनांच्या वेग मर्यादेबाबत उपाय करणे, ज्योतिबा शाळेजवळ वेग मर्यादेचा बोर्ड लावणे, शहरातील मुख्य मार्ग व अंतर्गत मार्गावरील अतिक्रमणामुळे वाहणे रस्त्यावर उभी असतात यासंदर्भात भुमिका निश्चित करणे, स्टंटबाज /कर्कश आवाजाची वाहणे यांवर बंदणे लावणे, राजुरा शहरात सि.सि.टि.व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था अध्ययावत करणे, राजुरा ते सास्ती व राजुरा ते गडचांदुर रोड वरील अनधिकृतपणे उभे असलेल्या जड वाहनांमुळे अपघात होत असतात यावर उपाय करणे, लायसन्स पासिंग करीता राजुरा व कोरपणा येथे नियमित शिबीर लावणे. राजुरा आगार डेपोत एकुण किती अधिकरी, कर्मचारी कार्यरत आहेत ? याची माहिती देणे, राजुरा आगारात एकुण किती बसेस उपलब्ध आहेत. व त्यापैकी नविन बसेस किती, जुन्या बसेस
किती, नविन बसेसची आवश्यक्ता असल्यास माहिती देणे. कोरोना परिस्थीती उदभवण्यापूर्वी जिथे जिथे बसेस सुरू होत्या तिथे बसेस सुरू करण्यात आले आहे की नाही ही वस्तुस्थिती तपासणे इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, उपविभागीय अधिकारी राजुरा संपत खलाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार, परिवहन अधिकारी चंद्रपूर कुलवीर शिंग कलशी , राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक मारुती पाटील, म. रा. परिवहन मंडळ चंद्रपूर, जिल्हा वाहतुक नियंत्रक घोडमारे, पोलिस निरीक्षक राजुरा चंद्रशेखर बहादुरे, उप अभियंता सा. बा. उपविभाग राजुरा आकाश बाजारे, विजय जांबूळकर, वैध मापनशास्त्र अधिकारी चंद्रपूर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here