Home Breaking News राजू यादव हत्याकांडातील आरोपींना अटक

राजू यादव हत्याकांडातील आरोपींना अटक

16
0

राजुरा – 31 जानेवारीला राजुरा येथील सलून मध्ये काही अज्ञात लोकांनी राजू यादव यांचेवर गोळीबार केला या गोळीबारात यादव हे जागीच ठार झाले होते.

आरोपी चंदन सितलाप्रसाद सिंग (वय ३०) जवाहर नगर, सत्यंद्र कुमार परमहंस सिंग (वय २८) हनुमान नगर रामपूर अशी असून यावर कलम ३०२, ३४ भादंवि ७/२७ नुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली आहे. घटनेप्रसंगी आरोपींनी वापरलेली दुचाकी एम एच ३४, बी टी – २५२४ आणि पिस्तूल जप्त करण्यात आली आहे.

राजुरा पोलीस स्टेशनमध्ये काही दिवसांपूर्वी नवीन ठाणेदार म्हणून चंद्रशेखर बहादूरे हे रुजू झाल्यावर या हत्याकांडाच त्यांच्यासमोर आवाहन होते मात्र त्यांनी हे आवाहन स्वीकारत आपल्या कार्यतत्परता दाखविली.

यादव हे कोळसा व्यापारी असून राजुरा व बल्लारपूर क्षेत्रात कोळसा माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे, या हत्येमागे हा व्यवसाय कारणीभूत असू शकतो अशी माहिती आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here