Home राजकारण राजुरा विधानसभा क्षेत्रात ८८ पैकी ३६ ग्रामपंचायतीवर शेतकरी संघटनेचा झेंडा *...

राजुरा विधानसभा क्षेत्रात ८८ पैकी ३६ ग्रामपंचायतीवर शेतकरी संघटनेचा झेंडा * मोठ्या व औद्योगिक ग्रा.पं. मध्येही मतदारांचा कौल

66
0

राजुरा ..

राजुरा विधानसभा क्षेत्रात ८८ पैकी ३६ ग्रामपंचायतीवर शेतकरी संघटनेचा झेंडा

* मोठ्या व औद्योगिक ग्रा.पं. मध्येही मतदारांचा कौल
राजुरा, दि.२१,तालुका प्रतिनिधी –
राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना व गोंडपिपरी तालुक्यातील ८८ पैकी ३६ ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी संघटनेचा झेंडा फडकला आहे. विशेष म्हणजे विठ्ठलवाडा,आवाळपूर, तोहगाव,धानोरा,कविटपेठ, गोवरी या प्रमुख व मोठ्या आणि औद्योगिक ग्रामपंचायत मध्ये मतदारांनी शेतकरी संघटनेवर विश्वास दाखवून विजयी केले आहे. तालुक्यातील ३६ ग्रामपंचायत मध्ये शेतकरी संघटनेचे सरपंच होणार असून मतदारांनी शेतकरी संघटनेच्या शिलेदारांवर विश्वास दाखवल्याबद्दल माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी जनतेचे आभार मानले आहे.
नुकत्याच राजुरा क्षेत्रातील ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. या निवडणुकीत राजुरा तालुक्यातील २८ पैकी ९ ग्रामपंचायतीवर शेतकरी संघटना बहुमताने विजयी झाली असून ७ ग्रामपंचायत मध्ये शेतकरी संघटना समर्थित युतीचा विजय झाला आहे राजुरा तालुक्यात चिंचोली खुर्द, कढोली ( बु.), मार्डा, धिडशी,चार्ली, सुमठाणा, खामोना,सातरी, मूर्ती याठिकाणी शेतकरी संघटनेचे उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत. शेतकरी संघटनेने युती करून चिंचोली (बु.),कविटपेठ, धानोरा, चंदनवाही, पेलोरा, गोवरी, पोवनी या सात गावात युती करून राजुरा तालुक्यात एकूण सोळा ग्रामपंचायत मध्ये शेतकरी संघटनेने आपले वरील वर्चस्व निर्माण केले आहे.
कोरपना तालुक्यात शेतकरी संघटनेची शेरज ( खुर्द ) ग्रामपंचायत अविरोध निवडून आली आहे. या तालुक्यात भारोसा,सांगोडा,वनोजा,कढोली (खुर्द), आवाळपूर, शेरज(बु), पिपरी आणि शेरज (खुर्द) या आठ ग्रामपंचायतीत शेतकरी संघटनेचा झेंडा फडकला आहे. याशिवाय युती करून हिरापूर, कोळशी (खुर्द ),नांदगाव व गाडेकर या चार ग्रामपंचायत मध्ये विजयश्री प्राप्त केली असून कोरपना तालुक्यात एकूण बारा ग्रामपंचायतमधे शेतकरी संघटनेची सरशी झाली आहे.
गोंडपिपरी तालुक्यात विठ्ठलवाडा,तोहोगाव,तारडा व वडकुली या चार गावात शेतकरी संघटना बहुमतात आली असून करंजी, नंदवर्धन, पोडसा, सालेझरी या चार ग्रामपंचायत मध्ये युती करून संघटनेचा वरचष्मा राहिला आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना व गोंडपिपरी या तिन्ही तालुक्यात एकूण ३६ ग्रामपंचायत मध्ये शेतकरी संघटनेला कौल दिल्याबद्दल माजी आमदार अँड.वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले, विदर्भ उपाध्यक्ष प्रभाकर दिवे, महिला प्रमुख प्रा.ज्योत्स्ना मोहितकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here