*शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहूजन आघाडी चे “किसानबाग” आंदोलन*
केंद्र सरकारने शेतकऱ्यांची गळचेपी करनारे नवे कृषी कायदे संसद मधे कोणतीही चर्चा न करता फक्त संख्याबळाचा गैरवापर करून या देशातील शेतकऱ्यांवर लादले. ज्यामुळे शेतकरी वर्ग भांडवलदारांच्या गुलामगिरी मधे जखडला जाईल. व म्हणून भारतातील सर्व शेतकरी एकत्रितपणे मोदी सरकार ने आनलेल्या काळ्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहे.
वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय *अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर* यांनी शेतकरी आंदोलनाला सक्रिय पाठींबा दिलेला आहे. व वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आज *बुधवार दिनांक २७ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ ते ४ पर्यंत* महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात *”किसानबाग”* आंदोलन करण्यात आले. नागपुर मधे *शहर अध्यक्ष रवीभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वात* संविधान चौक येथे “किसानबाग” आंदोलन अंतर्गत धरणे प्रदर्शन करण्यात आले व मागण्यांचे निवेदन मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
केंद्र सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून तिनही कायदे रद्द करावेत, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकरी विरोधी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरूस्ती करणारा अध्यादेश ताबडतोब काढावा व शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत हमीभाव मिळण्यासाठी कायद्यात स्पष्ट तरतूद करावी आणि त्याची कठोर अमलबजावणी करावी, इं मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या.
प्रसंगी जिल्हा अध्यक्ष विलास वाटकर, जेष्ट नेते राजूभाऊ लोखंडे, इंजि. राहुल वानखेडे, प्रा. रमेश पिसे, विवेक हाडके, प्रफुल माणके, अरविंद सांदेकर, नागेश बुरबुरे, आनंद चौरे, मुरलीधर मेश्राम, धर्मेंद्र मंडलिक, धर्मेश फुसाटे, प्रा. अजयकुमार बोरकर, राहुल दहिकर, कांचन देवगडे, निलिमा डंभारे, वर्षा धरगावे, मायाताई शेंडे, संध्या मेंढे, प्रतिमा काटकर, नंदिनी सोनी, शमा रामटेके, वर्षाताई बंसोड, शोभा नेवारे, सुमेध गोंडाणे, प्रविण पाटील, संजय सूर्यवंशी, सोनू चहांदे, मिलिंद मेश्राम, प्रशांत नितनवरे, इंजि. धम्मदिप लोखंडे, अंकुश मोहिले, रमेश कांबळे, सिध्दांत पाटील, अथांग करोडे, सुमधू गेडाम, शिलवंत मेश्राम, अतुल गजभिये, प्रतिक वंजारी, अविराज थुल, अतुल शेंडे, संदिप सुरडकर, सुनिल रामटेके, गौतम भिडे, संघपाल गाडेकर, इं पदाधिकारी व अनेक कार्यकर्ता उपस्थित होते.
प्रतिकार न्युज