▶️ नियमच कोणी पाळत नसल्याचं चित्र
▶️ पोच पावत्यासाठी शेतकरी मारतो चकरा
▶️ज्याचे हाती लागल्या पोच पावत्या तो बसतो शोधत
▶️पोच पावती काही मिळेना
राजुरा ..
प्रतिकार…
राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कापूस विक्री करताना आधी नोंदणी करा अशा प्रकारचे आवाहन केले होते .त्या नुसार शेतकरी बांधव आपल्या शेतात असलेल्या कापूस पेरा आधारे,कापूस विक्री करण्यासाठी कागद पत्रे घेऊन बाजार समिती राजुरा येथे येतात,त्या ठिकाणी फार्म देतातं पण अनेकजवळ पोच पावती मिळाली नसल्याने पुन्हा चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे,अनेकांच्या पावत्या घेऊन शेतकरी बांधव आपली पावती शोधत असताना दिसत आहे,अनेकांच्या पावत्या गहाळ होऊ शकते असे अनेक शेतकरी बोलताना दिसून येत आहे.पोच पावत्याचे बंडल ज्याचे हाती लागले तो घेऊन पाहत बसतो ,अनेक शेतकरी इकडून ,तिकडे फिरत असताना दिसत आहे. कोरोनाच्या काळात आधीच बाजार समितीच्या एक कर्मचारी कोरोना बाधित झाला होता ,आता तरी बाजार समिती प्रशासन नियमच पालन करताना दिसत नाही,गेट जवळ होत असलेली गर्दी ,आणि पोच पावत्यासाठी विचार पूस करताना शेतकरी बांधवांचे नकी नऊ येत आहे.
वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे,पण कोणालाच फुरसत नाही .
प्रतिनाकर न्युज
बातम्या जाहिरात करीता
सम्पर्क 7038636121