Home Breaking News शेतकऱ्याचं पांढर सोन व्यापाऱ्याच्या दारात जाण्यापूर्वी ,शासनाची कापूस खरेदी सुरु करावी, ...

शेतकऱ्याचं पांढर सोन व्यापाऱ्याच्या दारात जाण्यापूर्वी ,शासनाची कापूस खरेदी सुरु करावी, पांढर सोन शेतात मजूर मिळेना?सोयाबीन कापणीसाठी कोरोना मुळे मजूर बाहेगावचे नाही.

8
0

चंद्रपूर…
प्रतिनिधी
या वर्षी चंद्रपूर जिल्ह्यात काही तालुक्यात सोयाबीन ,कापूस यांचे चांगले उत्पन्न मिळेल असे शेतकरी बांधवाना वाटत आहे.कोरोनाच्या संकटाने या वर्षी बाहेर गावचे मजूर आले नाहीत ,त्यामुळे शेतकरी बांधवापुढे मोठे संकट उभे आहे.सध्या कापूस शेतात वेचणीसाठी वाट पाहत आहे,तर दुसरीकडे सोयाबीन सुद्या कापणीसाठी वाळलेले आहे.दरवर्षी बाहेर गावचे मजूर येत होते ,मात्र या वर्षी कोरोनाच्या संकटाने कोणतेही मजूर आले नाही.शेतात पांढर सोन दिसत आहे.आता शेतकरी बांधवांचे पुढील सण ,आणि शेती हंगाम या साठी लागणारा खर्च कापूस ,किंवा सोयाबीन विक्री करूनच आपला खर्च भागवावा लागतो .जिल्ह्यत् असलेले जिनिंग मालक पांढऱ्या सोन्याची वाट पाहत आहे.शासनाणी या वर्षी दिवाळीच्या आत कापूस खरेदी सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अन्यथा व्यापारी ,जीन मालक शेतकरी बांधवाची आर्थिक लूट केल्याशिवाय राहणार नसल्याचे शेतकरी बांधवासमोर भय सतावत आहे .कोरपना,राजुरा,जिवती ,वरोरा या भागात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन घेत असतात ,पावसामुळे ,ब्रम्हपुरी,मूल, पोंभुरणा,सावली ,सिंदेवाही,या भागात मोठा फटका बसला आहे,चंद्रपूर, भद्रावती ब्लहारपूर तालुक्यात इतर तालुक्यासारखे कापूस नाही,गोंडपिपरी तालुक्यात कापूस ,धन,सोयाबीन,पिके घेतात ,पण मुख्य कापूस,पीक या पाच सहा तालुक्यात मोठ्या प्रमाणात असते,कापूस निघाला की व्यापारी पडेल त्या भावाने खरेदी करून शेतकरी बांधवाची आर्थिक नुकसान करतात ,तेव्हा शासनांनी आधीच उपाय केला तर शेतकरी वाचू शकतो .

प्रतिकार न्युज

बातम्या जाहिरात करिता
सम्पर्क 7038636121

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here