Home Breaking News नवयुवकांनी मतदार यादीत नाव नोंदवून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करावा ...

नवयुवकांनी मतदार यादीत नाव नोंदवून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करावा – अपर जिल्हाधिकारी विद्यूत वरखेडकर

96
0

चंद्रपूर…

नवयुवकांनी मतदार यादीत नाव नोंदवून
राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करावा
– अपर जिल्हाधिकारी विद्यूत वरखेडकर

चंद्रपूर दि 25 जानेवारी : राष्ट्रीय मतदार दिवस हा लोकशाही बळकटीचा पाया असून, मतदार हा लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे 18 वर्ष पुर्ण करणाऱ्या उमेदवांरानी मतदार यादी मध्ये आपले नाव नोंदवून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करावा. तसेच याबाबत आपल्या मित्र-मैत्रिणीनाही अवगत करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी विद्यूत वरखेडकर यांनी आज केले.
जिल्हाधिकारी परिसरातील बचत साफल्य सभागृहात आज 11 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीस अपर जिल्हाधिकारी विद्यूत वरखेडकर यांनी उपस्थितांना मतदाना बाबत प्रतिज्ञा देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करुन, विद्यार्थी हे भविष्यातील निर्भय मतदार व्हावे, हा मुख्य उद्देश समोर ठेवून, 25 जानेवारी 2011 ला भारत निवडणूक आयोगा मार्फत या कार्यक्रमाची सूरूवात करण्यात अल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या एकुण 18 लक्ष 48 हजार 453 मतदारांची नोंद असल्याचे त्यांनी सांगितले. यात पुरुषांची संख्या 9 लक्ष 48 हजार 157 तर स्त्री मतदारांची संख्या 9 लक्ष 275 अशी आहे. तसेच एकुण मतदार 6 हजार 321 दिव्यांग मतदार आहे.
11 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्य जिल्हा स्तरावर प्रशासना तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कोविड -19 जागतिक महामारी व राष्ट्रीय मतदार दिन या विषयांवर निबंध लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व रंगोळी स्पर्धा समावेश होता. या स्पर्धांमध्ये विविध विद्यालयातील विद्यार्थीनिंनी सहभाग घेतला होता. ज्या विद्यार्थीनिंनी उत्कृष्ट, निबंध लेखन, उत्कृष्ट मतदान जागृतीचे वर्णन करणारी चित्रकला तसेच जागतिक व मतदान जागृती संदेश देणारी रंगोळी सादर केली असेल, त्यांना प्रथम, व्दितीय व त्तितीय पुरस्कार रोख व प्रशीस्त पत्र स्वरूपात देण्यात आले आहे.
उत्कृष्ट, निबंध लेखनासाठी प्रथम पुरस्कार प्राची नितीन उदार, मातोश्री विद्यालय, तुकुम, चंद्रपूर, व्दितीय पुरस्कार मिनल प्रेमदास चिकनकर, एफईएस गर्ल्स हायस्कूल, चंद्रपूर, त्तितीय पुरस्कार वेदीका राजकूमार आस्वले, मातोश्री विद्यालय, तुकुम, चंद्रपूर यांनी पटकावला आहे. जागतिक व मतदान जागृती संदेश देणारी रंगोळी स्पर्धा प्रथम पुरस्कार प्रांजली प्रमोद मेंदरे, मातोश्री विद्यालय, चंद्रपूर, व्दितीय पुरस्कार संजीवनी सुभाष गेडेकर, मातोश्री विद्यालय, तुकूम, चंद्रपूर, त्तितीय पुरस्कार रूपाली कैलास रामटेके, प्रियदर्शनी कन्या विद्यालय, चंद्रपूर व उत्कृष्ट मतदान जागृतीचे वर्णन करणारी चित्रकला सादरीकरणासाठी प्रथम पुरस्कार सेजल योगेश ढोके, भवानजीभाई चव्हाण हायस्कूल, चंद्रपूर, व्दितीय पुरस्कार मिनल प्रेमदास चिकनकर, एफईएस गर्ल्स हायस्कूल, चंद्रपूर, तर तृतीय पुरस्कार कल्पश्री यशवंत निकोडे, मातोश्री विद्यालय, चंद्रपूर या चंद्रपूर शहरतील विद्यालयातील विद्यार्थीनी पुरस्कार प्राप्त केले. तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेले दिव्यांग मतदार यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगूच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच नवमतदारांना नविन निवडणूक ओळख पत्र वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमास, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) प्रियंका पवार, पल्लवी घाटगे (रोहियो), शिक्षणाधिकारी श्री. नरड, तहसिलदार निलेश गौंड, विविध विद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षक/शिक्षीका, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतील कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन राजू धांडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार तहसिलदार सतीश साळवे यांनी व्यक्त केले.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here