प्रतिकार….
सिद्धार्थ गोसावी.द्वारा
मंगी (बु) येथे गांधी जयंती व शास्त्री जयंती साजरी
गावकऱ्यांनी घेतला गाव स्वच्छता करण्याचा संकल्प
गडचांदुर,,(ता,प्र,)
: मंगी (बु) येथे ग्राम पंचायीच्या वतीने 2 ऑक्टोंबर 2020 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची 116 वी जयंती दिनी स्वच्छतेचा गावकऱ्यांनी केला संकल्प. गांधी जयंती दिनापासून दररोज 30 ते 40 ग्रामस्थ व युवकांकडून पहाटे 4:00 ते 6:00 या दोन तासात संपूर्ण गावाची स्वच्छता करणार असल्याचे ग्रामस्थांनी जाहिर केले. ”आदर्शाचं विकास मॉडेल” असलेल्या मंगी (बु) गावात स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) व कोरोना जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी ”माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही संकल्पना राबविण्यात शासकीय यंत्रणेला सहकार्य करुन स्वत:चा व स्वत:च्या परिवाराचा व गावातील बांधवाचा जीव वाचवावा असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती सुनिल उरकुडे यांनी मनोगतातून व्यक्त केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांचे प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजुरा पंचायत समितीच्या सभापती मुमताज अब्दुल जावेद, कार्यक्रमाचे उदघाटक चंद्रपूर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती सुनिल उरकुडे, विशेष अतिथी उपसभापती मंगेश गुरनुले, जि.प. सदस्य डॉ. नामदेव करमनकर, मेघाताई नलगे, देवाडयाचे उपसरपंच अब्दुल जावेद, राजुरा पं.स.चे विस्तार अधिकारी (पंचायत) अमित अहाजनवार, अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे सिध्देश्वर जंपलवार, मंगी (बु) गावचे सरपंच रसिकाताई पेंदोर, उपसरपंच वासुदेवजी चापले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबादास जाधव, उपाध्यक्ष सुमनाई येमुलवार, पोलिस पाटील व्यंकटराव मुंडे, माजी जि.प. सदस्य भिमरावजी पुसाम, राजुरा येथील पत्रकार बंधू गणेश बेले, साळवेजी, संतोष कुंदोजवार तसेच ग्राम पंचायतीचे सचिव जी.बी. वंजारे, मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे, मुख्याध्यापक परशुराम तोडासाम, ग्रा.पं. सदस्य शंकर तोडासे, सोनबती मडावी, वसंत मेश्राम इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच वासुदेवजी चापले यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन विषय शिक्षक सुधीर झाडे, तर उपस्थितांचे आभार शिक्षक मारोती चापले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक श्रीनिवास गोरे, अंगणवाडी सेविका शारदाताई क्षिरसागर, भिमबाई कन्नाके तसेच गावातील युवक मंडळ, ग्राम पंचायत कर्मचारी नितीन मरसस्कोल्हे, चरणदास चिलकुलवार यांनी सहकार्य केले.
प्रतिकार न्यूज
बातम्या जाहिरात करीता
संपर्क 7038636121