Home शैक्षणिक धम्मज्ञान स्पर्धा २०२१ ,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य...

धम्मज्ञान स्पर्धा २०२१ ,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य व तत्वज्ञानावर आधारित ऑनलाइन परीक्षा .

1
0

नागपूर…

धम्मज्ञान स्पर्धा २०२१

नूतन वर्ष आणि माता रमाई जयंती निमित्त तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य व तत्वज्ञानावर आधारित ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

विचारक्रांती शिवाय आचारक्रांती शक्य नाही, हे सूत्र स्विकारूनच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युगपुरुषांच्या क्रांतीकारी जीवनकार्यांच्या सम्यक आकलनातूनच आजच्या युवक युवतीत आंबेडकरी आन्दोलनसंदर्भात जाणीव व जागृती निर्माण होईल हीच या धम्मज्ञान स्पर्धे मागील प्रेरणा.

ही धम्मज्ञान स्पर्धा वरील महापुरुषांच्या जीवनांवर आधारीत आहे. सगळे प्रश्न बहुपर्यायी असतील. या स्पर्धेत कोणत्याही वयोगटाच्या नागरिकास, युवक युवतीस भाग घेता येईल.

ही स्पर्धा www.tathagat.world या संकेत स्थळावर ऑनलाइन घेण्यात येईल.

स्पर्धेत भाग घेण्याकरीता www.tathagat.world या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी

ऑफलाइन नोंदणी करण्याकरिता खाली दिलेल्या मोबाइल नंबर वर संपर्क साधावा.

स्पर्धा दिनांक : ०७ फेब्रुवरी २०२१
वेळ : दु. १२.०० ते १२.४५
नोंदणी अंतिम तारीख : ०४ फेब्रुवरी २०२१
माध्यम : मराठी आणि इंग्लिश
एकूण प्रश्न : ५०
संकेत स्थळ : www.tathagat.world
मोबाइल नंबर: 9975117346 / 8857646064
नोंदणी फी: रु. ५० /-

मार्गदर्शक:
इंजि. जयंत इंगळे (वैचारिक अभिवादन परिक्षा संयोजन)
प्रा. घनश्याम धाबर्डे (पाली भाषा परीक्षा नियंत्रक, बीव्हीएसएस )
प्रा. डॉ. संजय गवई ( डिपार्टमेंट ऑफ़ सोशल वर्क, महात्मा बस्वेश्वर महाविद्यालय, लातूर )
मा. सुधाकर स्थूल ( सामाजिक कार्यकर्ता )

आयोजक:
विवेक स्थूल (बानाई सदस्य, सॉफ्टवेयर इंजीनियर ) – 9975117346
राज गणवीर (सॉफ्टवेयर इंजीनियर) – 8857646064

आकर्षक पुरष्कार:
प्रथम क्रमांक : रु. ३०,०००
द्वितीय क्रमांक : रु. २०,०००
तृतीय क्रमांक : रु. १०,०००
एकूण ५० विजेत्यांना एकूण रु. ७५,००० चे कॅश प्राइज दिले जातील.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here