Home Breaking News राजुरा कृषि विभाग,यूरिया कृतिम टंचाई निर्माण करणा-या दुकानदारांच्या दावनिला…

राजुरा कृषि विभाग,यूरिया कृतिम टंचाई निर्माण करणा-या दुकानदारांच्या दावनिला…

60
0

 

 

♦️राजुरा शहरात युरीया खतांची टंचाई. ..

 

♦️  कृषी विभाग बंगल्याच्या भुमिकाकेत

 

♦️ युरीया खतांची कृतीम टंचाई करणा-या

♦️  दुकानदारांवर

♦️ कृषी विभाग मेहेरबान…..

 

 

राजुरा…

प्रतिनिधी…

राजुरा तालुक्यातील काही कृषी केंद्र संचालक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या दावनिला बांधलेले आहेत का हा प्रश्न निर्माण झाला आहे.तेरा जुन रोजी युरीया कृतीम टंचाई निर्माण करणा-या कांहीं दुकानदार युरीया असुनही दिला नाही.या बाबत माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत माहिती मागितली.परंतु माहिती जाणून बुजून, चुकीच्या  पध्दतीने दिली.तसेच बारा तारखेला युरीया ज्या शेतकऱ्यांना विक्री केली त्यांच्या  पावत्या सहीत माहिती मागितली .पण फक्त एकच दुकानदार यांनी पावत्या सोबत जोडुन माहिती दिली.इतरानी मात्र बरोबर माहीती दिली नसल्याने ,अपील केले दोन महिन्यांनंतर म्हणजे सप्तेंबर महीण्यात अपीलीय अधिकारी यांचेसमोर जेव्हा माहीती दिली नसल्याने मी अपील केले आहे.असे सांगितले.मला माहीती देतांना जी माहिती मागितली ती दिली नाही.या बाबत अपीलीय अधिकारी यांनी दुकानदार यांच्या कडे पावत्या नसल्याने,त्यांनी आम्हाला माहिती देताना पावत्या दिलेल्या नाही.आम्हाला जेवढी माहीती मीळाली तेवढी दिली.याचाच अर्थ असा होतो की कृषी संचालक काही दुकानदार शेतकरी बांधवांना बील देत नाही हे सिद्ध होते.ज्या तिनं दुकान दार यांनी दिलेल्या माहितीनुसार ,युरीया खत शिल्लक होते.परंतु दुकानाच्या समोर भाव,फलक,रेट बोर्ड दर्शनी भागात लावलें पाहीजे असा नियम आहे.पण सर्व नियम धाब्यावर बसवून ठेवले आहे.अपीलीय अधिकारी यांनी, माहीती अधीकार अधिनियम कायद्याच्या चौकटीत राहून , कारवाई करायला पाहिजे होती पण दुकानदाराला वाचविण्यासाठी खटाटोप केल्याचे दिसून येते.याबाबत जिल्हा कृषि अधिकारी यांचेकडे अपील करण्यात येणार आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here