Home विशेष 31 जानेवारीपुर्वी मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती सादर करावी

31 जानेवारीपुर्वी मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती सादर करावी

4
0

प्रतिकार

शासकीय निमशासकीय, खाजगी क्षेत्रातील आस्थापणांना आवाहन
चंद्रपूर, दि. 20 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापणांनी सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा, १९५९ व नियम १९६० च्या कलमान्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय निमशासकीय, तसेच कलम ५(२) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापणांना त्यांच्या आस्थापणेवरील सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस, विहीत नमुना ईआर-१ मध्ये कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.
त्यानुसार डिसेंबर २०२० अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-१ मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,प्रशासकीय भवन, पहीला माळा,हॉल क्र.५/६ चंद्रपूर या कार्यालयाव्दारे चालू आहे. यास्तव,या सर्व आस्थापणांना कार्यालयाकडून युझर नेम व पासवर्ड देण्यांत आलेले आहेत. त्याचा वापर करुन प्रत्येक आस्थापनेने www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी. सदरील तिमाही विवरणपत्र सादर करण्यांची अंतिम तारीख दि. 31 जानेवारी 2021 ही आहे. तसेच प्रत्येक आस्थापणेने आपला नोंदणी तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्ययावत करावा.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी asstdiremp.chandrapur@ese.maharashtra.gov.in , chandrapurrojgar@gmail.com, यावर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधल्यास, सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी कळविले आहे.
000

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here