Home आपला जिल्हा शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार नियमावलीबाबत अभिप्राय आमंत्रित

शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार नियमावलीबाबत अभिप्राय आमंत्रित

1
0

प्रतिकार

निलेश नगराळे

चंद्रपूर, दि. 19 जानेवारी : प्रतीवर्षी शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार, शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रिडा मार्गदर्शक जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती खेळाडू, साहसी, दिव्यांग खेळाडू पुरस्कार देण्यात येतात. याबाबतची नियमावली शासन निर्णय दि. 24 जानेवारी 2020 नुसार निर्गमित केलेली आहे. सदर नियमावलीमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे.
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय दि. 22 जानेवारी 2021 पर्यंत मागविण्याचे शासनाने निर्देशित केलेले आहे. पुरस्काराच्या प्रस्तावित सुधारणा नियमावलीची प्रत क्रिडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
पुरस्कार नियमावलीच्या प्रस्तावित सुधारणांबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांनी आपल्या सुचना व अभिप्राय dsysdesk14@gmail.com किंवा desk14.dsys-mh@gov.in या मेलवर दि.22 जानेवारी 2021 रोजी पर्यंत पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांचेशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी केले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here