प्रतिकार न्युज
(निलेश नगराळे) राजुरा
राजुरा :– राजुरा विधानसभा क्षेत्रातील एकुण ८९ ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर करण्यात आले. यात राजुरा विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात राजुरा (१५), कोरपना (८) व गोंडपिपरी (२३) या चारही तालुक्यातील स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शर्थ करुन एकुण ४६ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना ‘ राजुरा विधानसभा मतदारसंघातील जनतेने काँग्रेस पक्षाला सर्वाधिक ४६ ग्रामपंचायतींची सत्ता सोपविली असून आमच्या विकास कामावर जनतेने उमटवलेली ही विजयी मोहर आहे. सर्व विजयी उमेदवार आणि जनतेचे मी अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Rajura taluka grampanchayat winner congress
राजुरा तालुक्यातील बामनवाडा, चनाखा, पंचाळा, सिंधी, विहिरगाव, कविठपेठ, चंदनवाही, मुठरा, कडमना, नलफडी, मुर्ती, चार्ली या १२ आणि गोवरी (काँग्रेस आघाडी), मारडा (काँग्रेस आघाडी), वरोडा (काँग्रेस आघाडी) या ३ अशा एकूण १५ ग्रामपंचायवर काँग्रेसचा झेंडा रोवला आहे. तर भाजप चुनाळा, सातरी, कोहपरा, धानोरा, चिंचोली बु, सुमठाणा, खामोना, पेल्लोरा या ८, शे. संघटना १ – चिंचोली खु, अपक्ष ४ – कोलगाव, पवनी, धिडसी, कडोली बु ग्रामपंचायतीवर विजय मिळविला आहे.
Pratikar News Chandrapur
कोरपना तालुक्यातील शेरज बु , तळोधी, गाडेगाव, नांदगाव, भोयगाव, कढोली, हिरापूर (काँग्रेस आघाडी), सांगोडा (काँग्रेस आघाडी), अशा एकूण ८ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे. तर भाजप – कोडसी , लोणी, पिपरी, शेरज खु, नारंडा या ५ तर शे. संघटना- भारोसा, आवाळपुर, वनोजा, कोडसी खु या ४ ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे.
जिवती तालुक्यातील एकमेव परमडोली ग्रामपंचायतीचा निकाल समिश्र आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी, सालेझरी, विहिरगाव, वटराना, वेजगाव, लाठी, वेडगाव, सखनुर, हेटीनांदगाव, सोमनपल्ली, वडकूली, तारसा बु, कोरंबी, पोडसा, नंदवर्धन, बेरडी, बोरगाव, सुपगाव, धामणगाव, दरूर, पारगाव, डोंगरगाव, तोहोगांव (काँग्रेस आघाडी) असे एकूण २३ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा रोवला आहे. तर भाजपच्या १२ ( भांगाराम तळोधी, धाबा, खराडपेठ, धानापुर, सोनापूर, हिवरा, चक लिखितवाडा, चेक बोरगाव, पानोरा, अडेगाव, चेकदरुर, चेक पिपरी, ) संघटना १ ( विठ्ठलवाडा ) राष्ट्रवादी १( वडोली ) , शिवसेना १( तारडा ) , अपक्ष ४ ( आक्सापूर, करंजी, पुरडी हेटी, किरमिरी, चेक घडोली ) या ग्रामपंचायतवर विजय मिळविला आहे.