
चंद्रपूर:दुर्गापूर पोलिस स्टेशन अंतर्गत बॅंक आॅफ इंडीया चे ATM, व ATM मधील CCTV कॅमेरा फोडून पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वि. स. बालकास पोलीस स्टेशन दुर्गापूर घेतले ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे रिपोर्ट दिल्यावरून अप. क्र.16/21 अन्वये कलम 379, 511 भादवी चा गुन्हा दि. 15/01/21 रोजी दाखल करण्यात आला होता.
सविस्तर वृत्त असे की, दि. 14/01/21 चे रात्री 03:00 वा. चे सुमारास बँक ऑफ़ इंडिया ATM शक्तीनगर, येथुन ATM मशीन व CCTV कॅमेरा ची तोडफोड करून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. सदर गुन्ह्यात दुर्गापूर पोलीसांनी एका वि. स. बालकाला ताब्यात घेतले, वि. स. बालकाने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या कडुन गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
ही कार्यवाही दुर्गापुर यांच्या ठाणेदार स्वप्निल धुळे यांचे मार्गदर्शनात पोउपनी प्रविण सोनोने सुनिल गौरकार उमेश वाघमारे मनोहर जाधव संतोष आडेे सुरज लाटकर यांनी केली.