संत शिरोमणि संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी नीमीत्य रक्तदान व प्लाझमा दान शिबिराचे आयोजन.
राजुरा 16 जानेवारी
श्री संत संताजी जगनाडे महाराज शिक्षण प्रसारक मंडळ राजूरा ,विदर्भ तेली समाज संघटना राजुरा ,तेली समाज कल्याण मंडळ वेकोली ,तेली समाज युवक मंडळ राजुरा यांच्या संयुक्त वीद्यमानाने संत शिरोमणि संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी नीमीत्य भव्य रक्तदान व प्लाझमादान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १७ जानेवारी रोज रविवार ला संताजी सभागृह ,गडचांदुर रोड ,सास्ती टी पॉईंट ,रामपूर -राजुरा येथे सकाळी 10 वाजता पासून शिबिराला सुरुवात होईल. सदर शिबिराला राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, राजुरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसूरकर आदींसह अनेक मान्यवर भेट देणार आहेत. या शिबिरात समाजबांधवासह इतरही समाजबांधवांनी सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनि केले आहे. या शिबिरात रक्तदान करणाऱ्याना आयोजकांच्या वतीने सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र भेट देऊन गौरवीन्यात येणार आहे.
प्रतिकार न्यूज़