Home शैक्षणिक शेकडो युवकांच्या उपस्थितीत पोलीस-आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन जन विकास सेनेचा उपक्रम

शेकडो युवकांच्या उपस्थितीत पोलीस-आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन जन विकास सेनेचा उपक्रम

1
0

चंद्रपुर…

शेकडो युवकांच्या उपस्थितीत पोलीस-आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन
जन विकास सेनेचा उपक्रम

जन विकास सेनेतर्फे पोलीस आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक १६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता चांदा क्लब ग्राउंड चंद्रपूर येथे जिल्ह्यातील ३०० च्यावर युवक-युवतींच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उद्घाटक म्हणून वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड चंद्रपूर क्षेत्राचे महाप्रबंधक आभासचंद्र सिंह तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख,मुख्य अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक श्रीराम तोडासे, प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक उत्थान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ डांगे व सचिव हरीश गाडे,श्रीमती सितादेवी जम्पलवार,माजी सुभेदार प्रभाकर जांभुळकर ,फिजिकल ट्रेनर रोशन भुजाडे,स्पर्धा परीक्षेचे तज्ञ मार्गदर्शक स्वप्नपूर्ती अकॅडमीचे संचालक सुरज उराडे,स्पर्धा परीक्षा प्रशिक्षक व समुपदेशक अनिल दहागावकर, वासनिक सर अकॅडमीचे संचालक संजय वासनिक,श्रीराम स्पोर्टस्चे संचालक संदिप वाढई उपस्थित होते.
वेकोलीचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभासचंद्र सिंह व इतर मान्यवरांनी मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.उपस्थित मान्यवरांनी संबोधित करून युवकांना
मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल दडमल तसेच आभार प्रदर्शन अक्षय येरगुडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता घनशाम येरगुडे,देवराव हटवार,दिनेश कंपु,इमदाद शेख,गोलु दखने,नामदेव पिपरे, मनीषा बोबडे,निर्मला नगराळे,
,आकाश लोडे,गितेश शेंडे,प्रफुल बैरम,अमोल घोडमारे सतिश येंसाबरे, भाग्यश्री मुधोळकर,सुनयना क्षिरसागर,निलेश पाझारे, धर्मेंद्र शेंडे, सुनील थेरे, प्रकाश कांबळे,शालीनीताई थेरे, मंगलाताई कांबळे,रमा देशमुख यांनी अथक प्रयत्न केले.या प्रशिक्षण शिबिरांमध्ये चंद्रपुरातील प्रसिद्ध फिजिकल ट्रेनर रोशन भुजाडे तसेच स्वप्नपूर्ती अकॅडमीचे स्पर्धा परीक्षेमध्ये तज्ञ असलेले सुरज उरकुडे हे शारीरिक व लेखी मार्गदर्शन करणार आहेत. अनिल दहागांवकर यांच्यातर्फे दर हप्त्याला शैक्षणिक व मानसिक समुपदेशन करण्यात येणार आहे.

संकलन
(निलेश पाझारे)

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here