चंद्रपुर…
राज्यस्तरीय खुल्या वकृत्व स्पर्धेत झालेल्या सिद्धार्थ चव्हाण याला विशेष वक्ता पुरस्काराने सन्मानित..
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील रोडगुडा येतील श्री, शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे सिद्धार्थ राहुल चव्हाण हा विद्यार्थी पदवीचे अंतिम शिक्षण घेत आहे. सिद्धार्थने अनेक वकृत्व स्पर्धेत हिरहिने सहभाग घेऊन प्रावीण्य प्राप्त केले आहे.
द प्रॅक्टिकल अकॅडमी आणि पी.एन .एस. याच्या तर्फे आयोजित खुली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा धनोजी कुणबी समाज सभागृह नागपूर (मानेवाडा) येथे पार पडली होती.या राज्यस्तरीय खुल्या वकृत्व स्पर्धेत सिद्धार्थ राहुल चव्हाण याला आदिवासी क्षेत्राच्या विशेष वक्ता पुरस्काराने सन्मानित आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. या स्पर्धेला उद्धघाटक म्हणून नितेश कराळे फिनिष करीअर डेवलोपमेंट अकॅडमी वर्धा व बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक , तर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले तुषार सुर्यवंशी स्पत खणजेरी वादक तानाजी वल्ले , नागपूर महानगर पालिका विरोधी पक्ष नेते, अॅड.वामनराव चटप राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार , कार्यक्रमाचे अध्यक्ष विशाल मुद्दमवार , स्वयम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष उपस्थित होते. सिद्धार्थच्या या यशाबद्दल आई- वडील, मित्र परिवार, शिक्षक वृंद या सर्वांकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे.
प्रतिकार न्यूज़