Home आपला जिल्हा उत्तम उपहारातून गुलाब ऐवजी निघाल्या अळ्या

उत्तम उपहारातून गुलाब ऐवजी निघाल्या अळ्या

44
0

चंद्रपूर  – चंद्रपुरातील नामांकित समाधान पूर्ती सुपर बाजारातून खरेदी केलेल्या उत्तम कंपनीच्या गुलाब जामुन मिक्स पावडर मध्ये मोठं मोठ्या अळ्या निघाल्यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.चंद्रपूर शहरातील नामांकित बाजारामध्ये असे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केल्या जात आहे.अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागामार्फत समाधान पूर्ती सुपर बाजाराची सखोल तपासणी करावी अशी मागणी ग्राहक राजकपूर भडके यांनी केली आहे.
दिनांक 12 जानेवारी रोजी राजकपूर भडके हे आपल्या कामानिमित्त चंद्रपूरला गेले असता कामे आटोपून परतीच्या मार्गात काही समान खरेदी करिता चंद्रपुरातील जेटपुरा गेट जवळील समाधान पूर्ती बाजारात गेले, व आपल्या मुलाच्या आवडीनुसार त्यांनी तिथून उत्तम नावाचा गुलाब जामुन मिक्स पावडर पाकिट आणि डोनट अश्या दोन वस्तू विकत घेतल्या त्याचे अनुक्रमे 60 आणि 10 एकूण 70 रुपये बिलही दिला, घरी येऊन दुसऱ्या दिवशी पाकिट फोडून एका ताटामध्ये घेतले असता त्यातून पांढऱ्या तापकीर रंगाच्या अळ्या बाहेर चालायला लागल्या , लागलीच आजूबाजूच्याना बोलावून दाखवलं,सर्वाना जब्बर धक्का बसल्याने आश्चर्य व्यक्त करीत चिंतासुद्धा व्यक्त केली आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here